Home Maharashtra कूरखेडा उपविभागीय कार्यालयावर आज मोर्चा…

कूरखेडा उपविभागीय कार्यालयावर आज मोर्चा…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

       तालूक्यातील शेतकऱ्यांना अखंडित २४ तास विद्यूत पूरवठा करण्यात यावा या मागणी करीता आज १३ मार्च बूधवार रोजी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना विजय वडेट्टीवार यांचा नेतृत्वात येथील गांधी चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

       तालूक्यात भारनियमनामूळे रब्बी धान पीक धोक्यात आले आहे त्यामूळे कृषी पंप व घरगूती विद्यूत ग्राहकाना सूद्धा २४ तास विज पूरवठा करण्यात यावा. शासनाने घोषित केलेला हेक्टरी २० हजाराचा बोनस तातडीने शेतकर्याना अदा करण्यात यावा. याकरीता महाविकास आघाडीचे घटक पक्ष कांग्रेस व शिवसेना उबाठा गटाचा वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मोर्चाचे नेतृत्व ना. विजय वडेट्टीवार शिवसेना उबाठा जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे करणार आहेत.