Home सांस्कृतिक भागवत सप्ताह निमीत्य निघालेल्या कलश शोभा यात्रेने शहर दूमदूमले…

भागवत सप्ताह निमीत्य निघालेल्या कलश शोभा यात्रेने शहर दूमदूमले…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

           शहरात श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे दि १३ ते १९ फेब्रूवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे .या निमीत्य आज दि १३ फेब्रूवारी मंगळवार रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर येथून काढण्यात आली.

      शोभायात्रा कथा वाचक पंडीत अविनाश दूबे महाराज, शिवसेना उ.बा.ठा. जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, ज्येष्ठ नागरिक विजय झंवर, सामाजिक कार्यकर्ते देवेन्द्र फाये, राकेश चव्हाण, निर्मलबाई उईके,नर्मदाबाई डेकाटे, अश्विनी पिंपळकर,विजय पूस्तोडे,अशोक माखिजा यांचा मार्गदर्शनात वाजत गाजत कलश शोभा यात्रा शहरातील हनुमान मंदिर ते कूंभीटोलारोड,गांधीवार्ड ते बाजारपेठ मार्गे पून्हा हनुमान मंदिर येथे पोहचली.

           येथे गौरी गणेश व ग्रामदेवतेचे पूजन करीत घटस्थापना करण्यात आली. हनुमान मंदिर प्रांगणात आयोजित भागवत सप्ताहात कथावाचक पंडित अविनाश दूबे महाराज यांचा द्वारे भागवत कथा वाचन,हवन गितापाठ व अध्यात्मावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच गोपाल काला, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन सूद्धा करण्यात आले आहे कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक भागवत प्रेमी ग्रामवासी व हनुमान मंदिर कमेटी कूरखेडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.