Home Maharashtra पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार असोसिएशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न… 

पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार असोसिएशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न… 

      उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती 

          मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन भद्रावती तालुका पत्रकार असोसिएशन तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        पत्रकार असोसिएशनच्या कार्यालयात दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार विवेक सरपटवार यांनी मार्गदर्शन केले.

         त्यानंतर ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी मयूर जीवने, पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष विनायक येसेकर, वरिष्ठ पत्रकार के एस रावडे, विवेक सरपटवार, दिलीप ठेंगे ,दिलीप मांढरे ,राजु गैनवार, राजेश रेवते, निलेश नवराते, पवन मांढरे आदी उपस्थित होते.