ट्रकच्या धडकेतील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू, दर्यापूर येथिल घटना..

युवराज डोंगरे – खल्लार 

            उपसंपादक 

   रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्या इसमास ट्रकची धडक लागली.या घटनेतील जखमीचा उपचारा दरम्यान दर्यापूरातील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सदर घटना शनिवार (दि.6) रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास दर्यापूर बसस्थानकासमोर घडली आहे.

                   गजानन रामदास तायडे (वय.42)  रा जैनपूर-पिंपळोद असे अपघातातील मृतकाचे नाव आहे. सविस्तर असे की,घटनेच्यावेळी मुतक गजानन हे आपल्या आई वडीलासह जैनपूर गावातून  दवाखान्यात जाण्यासाठी दर्यापूरात आले होते. 

       दरम्यान बसस्थानका लगतच्या शिवाजी चौक चौफुलीवर रस्ता ओलाडतांना रस्त्याच्या मधोमध एम.एच 27 बी.एक्स 3594 ट्रकच्या समोरील बोनेटची धडक लागून खाली कोसळले.

        अपघात होताच नागरिकांनी जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराला प्रतीसाद न दिल्याने 10 मिनीटातच गंभीर जखमी गजानन तायडे यांचा मृत्यू झाला. 

          ज्या ट्रकनी अपघात झाला,त्या ट्रकला दर्यापूर पोलिसांनी जप्त केले आहे.  वुत्तलिहीस्तोवर ट्रकचालक शेख तैसीम शेख करीम (32) रा.टाकळी यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.