Home देशविदेश सावित्रीबाई फुले चे आदर्श जपा :- महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे.. —...

सावित्रीबाई फुले चे आदर्श जपा :- महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे.. — खैरलांजी येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीत पेन वहीचे वाटप..

     ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर आपण नसतो.महिलांकरिता सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर शेण सहन केलय,दगड धोंडे खाल्ले,तरी पण सुद्धा शिक्षणाच्या अध्यापन करण्याचा छंद सोडले नाही.

         म्हणून आपण सर्व महिला मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ आहोत.हे सर्व श्रेय जाते सावित्रीबाई फुले यांना,म्हणून सावित्रीबाई फुले यांचे आदर्श जपा असे मत वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी खैरलांजी येथील गोपाळ वस्ती येथे नोटबुक व पेनाचे वाटप करताना व्यक्त केले व तेथील लोकांना मार्गदर्शन केले.

           याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे,वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी.रंगारी,जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर,जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश गजभिये,तालुका महासचिव अमित नागदेवे,तालुका महिला महासचिव शितल नागदेवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

        डी.जी.रंगारी यांनी गोपाळ वस्तीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी यांनी शिक्षणाकरता सर्वांसाठी शिक्षनाचे दारे खुली केली,विविध समस्यांना तोंड देत ते महिलांसाठी झिजले त्यामुळे त्यांच्या आदर्श व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना व सर्वांना अधिकार दिले.त्याच्या आदर्श आपण ठेवला पाहिजे असे मत डी.जी.रंगारी यांनी व्यक्त केले. 

         याप्रसंगी महिला जिल्हा आढेक्स तनुजा नागदेवे,जिल्हा संघटक डी जी रंगारी,जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर,गणेश गजभिये,अमित नागदेवे ,तालुका महिला महासचिव शितल नागदेवे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.