Home देशविदेश आळंदीत भाजपाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

आळंदीत भाजपाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : येथील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात प्रथम शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.

          याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष भागवत काटकर, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता फपाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष वासुदेव तुर्की, माऊली थोरवे, शंतनु पोफळे, योगिता काटकर, मीना चव्हाण, आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला.

          स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही अशक्य नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय. सावित्रीमाई धाडसाचा पर्वत होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाचे कार्य आपल्या अंतापर्यंत सुरु ठेवले. आयुष्यातील सर्व संकटांना त्यांनी निर्धाराने हरविले आहे. “सावित्रीमाईंच्या त्यागाची महिलांनी जाण ठेवावी”असे भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी म्हटले.