युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील विविध समस्या बाबत तसेच मानवी हक्काशी निगडित प्रशासनावर प्रशासनाची उदासिनता कळसाला पोचली असून न्याय मागणी साठी उपोषणास बसलेल्या आंदोलकाच्या मागण्या अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्याने आत्मदहनाच्या इशारा देण्याची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे.
वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष चंदू रायबोले यांनी सर्वसामान्य हक्कासाठी आणि प्रशासनाच्या दिव्यांग विरोधात शांततामय मार्गाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र अनेक दिवस उलटूनही तहसिल प्रशासनाकडून ठोस निर्णय लेखी आश्वासन किंवा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकाची मानसिक अवस्था अत्यंत तणावपूर्ण झाली आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच आज आत्मदहनसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागत आहे. प्रशासनाचा उद्देश जनतेच्या समस्या ऐकून त्यावेळेस सोडवणे हाच असतो परंतु 15 महिने उलटूनही प्रशासनाने उपोषणकर्त्यांची एकाही मागण्यांची पूर्णतः केली नाही. फक्त वेळ काढू पणाचे धोरण अवलंबले आहे.
उपोषणकर्त्याच्या मागण्या वैयक्तिक नसून सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याचे सांगितले जात असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे जर एखाद्या नागरिकाला आपल्या हक्कासाठी स्वतःच्या जीवावर भेटणारा इशारा द्यावा लागत असेल तर हे प्रशासनाच्या अपयशाची आणि संवेदन शून्य कारभाराचे जिवंत उदाहरण ठरते याबाबत एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी दर्यापूर तहसील कार्यालय प्रशासनावरच राहील याची नोंद घ्यावी येत्या दोन तारखेला तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंदू भाऊ रायबोले यांनी प्रशासनाला दिला आहे.



