मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन शपथ ग्रहण संपन्न..

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन आयोजित करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिन शपथ ग्रहण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी भूषविले.

         याप्रसंगी प्रा डॉ आर पी किरमिरे प्रा डॉ.लांजेवार, प्रा डॉ,पी एन वाघ प्रा डॉ, वीणा जम्बेवार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांचे बाबत बहुमूल्य विचार प्रमुख अतिथी प्रा डॉ गणेश चूधरी यांनी व्यक्त केले.

         या प्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ.प्रियंका पठाडे यांनी मानले याप्रसंगी प्रा डॉ.झाडे, प्रा डॉ, धवनकर , प्रा डॉ .मुरकुटे प्रा पुण्यपरेड्डीवार सर प्रा.भैसारे मॅडम ,प्रा .डॉ .गोहने, प्रा. मानतेश तोंडरे इत्यादि प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.