Home देशविदेश आमरण उपोषणातंर्गत मनोज जरांगे पाटील उद्यापासून नाही पिणार पाणी… — मुंबईच्या...

आमरण उपोषणातंर्गत मनोज जरांगे पाटील उद्यापासून नाही पिणार पाणी… — मुंबईच्या आझाद मैदानाकडे आता सर्वांचे लक्ष…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

        विविध आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला मागासलेपणा अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मागील २ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील सातत्याने करीत आहेत.

      त्यांच्या मागणीकडे महाराष्ट्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ते उद्यापासून आमरण उपोषणातंर्गत पाणी पिणार नसल्याचे आझाद मैदान मुंबई येथून त्यांनी आज स्पष्ट केले.

         यामुळे महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घेते की पुन्हा बहानेबाजी अन्वये वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करते,हे येणाऱ्या २४ तासात कळणार आहे.

          मात्र,मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा व दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवेगळ्या वेळकाढू चालींचा अनुभव घेतला असल्याने ते आता मराठा आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी मरण पत्करण्यास सज्ज झाले आहेत.

           उद्यापासून म्हणजेच दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोज सोमवार पासून आमरण उपोषणातंर्गत पाणी पिणार नसल्याची त्यांनी आज केलेली घोषणा महाराष्ट्र सरकारसाठी गंभीरता निर्माण करणारी आहे.

         मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर प्रसंगी सरकार गमावण्याची वेळ भाजपावर येण्याची शक्यता आहे.