अवैध दारू तस्करी करणाऱ्याचा भद्रावती पोलिसांनी आवळल्या मुसक्या… — एक महिलेसह 2 आरोपी अटकेत एकुन 1,77,750 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…

     उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती 

          भद्रावती शहरात दारुची साठवणूक करून अवैध दारू विक्री करणाऱ्या 1 महिले सह 2 आरोपींना अटक करून त्यांचे कडून 2 मोटर सायकल आणि देशी दारुच्या 17 पेट्या असा एकुण् 1,77,750 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त आहे.

              दि. 30 जाने ला ड्राय डे च्या दिवशी शहरात दारुची साठवनुक् करून अवैध दारू विक्रि करत असल्याची माहिती मिडताच भद्रावती पोलिसानी सापळे रचुन 1 महिले सह 2 आरोपिना अटक केली. त्यात आरोपी गोलू अरविंद देवगड़े, वय 24, रा भंगाराम वार्ड, आणि दूसरा शुभम रमेश गजभीये, वय 25 वर्ष, रा चंडिका वार्ड आणि 1 महिला रा भद्रावती असुन त्यांचे कडून 2 मोटर सायकल आणि देशी दारुच्या 17 पेट्या असा एकुण् 1,77,750 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त असुन आरोपिना ताब्यात घेतले आहे. 

            ही सदरची कारवाई पोलिस अधीक्षक चंदपुर, अपार पोलिस अधीक्षक चंदपुर, सहपोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा, पोलिस निरीक्षक भद्रावती बिपिन इंगले यांचे मार्गदर्शनात् पो.उप.नि.सैयद मोहम्मद, स.फौ. गजानन तुपकर, ना.पो. जगदीश झाड़े, निकेश् ढेंगे, विश्वनाथ चुदरी, यांनी केली आहे.