Home Crime नांदगावपेठ पोलिसांच्या कारवाईत नकली नोटा बनवणारा मुख्य आरोपी पकडला…

नांदगावपेठ पोलिसांच्या कारवाईत नकली नोटा बनवणारा मुख्य आरोपी पकडला…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

अमरावती :- नांदगावपेठ पोलीस ठाण्यातील नकली नोटा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात नकली नोटा बनवणारा मुख्य आरोपी अब्दुल तौसिफ अब्दुल करीम (वय 26, रा. सुफीयाना नगर, अमरावती) याला अटक करण्यात आली आहे.

         सदर प्रकरणात यापूर्वी संचित अरविंद चव्हाण (रा. मिलिंद नगर, राहटगाव), दिपक बाबुलाल खंडारे (रा. पंचशिल नगर, राहटगाव), आदित्य किशोर रामेकर (रा. समर्थवाडी, राहटगाव), यश सतिष बर्वे (रा. कोट गावंडी, ता. चांदुर बाजार), साहील संजय गाडबैल (रा. बेलोरा, ता. चांदुर बाजार) आरोपींना अटक करण्यात आली होती: या आरोपींकडून 500 रुपयांच्या 167 नोटा (एकूण 83,500 रुपये) जप्त करण्यात आल्या होत्या.

मुख्य आरोपीवर कारवाई…

         गुप्त माहितीनुसार, अब्दुल तौसिफ स्वतः नकली नोटा बनवून बाजारात आणत होता. या माहितीच्या आधारे 28 नोव्हेंबर 2025 रोजी नांदगावपेठ पोलीस तपास पथकाने तौसिफला अटक केली.

           न्यायालयाने तपासासाठी त्याला दोन दिवसांचा पी.सी.आर मंजूर केला.अब्दुल तौसिफच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत नकली नोटा बनविण्याचे साहित्य सापडले.हिरव्या रंगाचे प्लॅटिंग थ्रेट, रबरी शिक्के, ड्रेसिंग पेपर, कटर, ग्लू, प्रिंटर, बॉण्ड पेपर सापडले.

           त्याचबरोबर 500 रुपयांच्या 20 नोटा (एकूण 10,000 रुपये) आणि 200 रुपयांच्या 55 नोटा (एकूण 11,000 रुपये) असा एकूण 21,000 रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या.तपासात समोर आले की, अब्दुल तौसिफ याच्याविरुद्ध यापूर्वी नागपूर पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे नकली नोटा बनवण्याचा गुन्हा नोंदवला गेला होता.

           ही कारवाई पोलीस आयुक्त श्री.अरविंद चावरीया, पोलीस उपायुक्त श्री.गणेश शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री.कैलास पुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.