Home देशविदेश आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा,बच्चू कडू मुंबईला जाणार…. — शेतकरी चिखलात…. —...

आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा,बच्चू कडू मुंबईला जाणार…. — शेतकरी चिखलात…. — अन्यथा उद्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रेल्वे रोको आंदोलन….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

        राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागण्यांबाबत भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली.

          सदर चर्चेला अनुसरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांसोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे.

         शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बाबत व इतर २१ मागण्या बाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी मंत्री हे सकारात्मक कर्तव्य पार पाडतात काय?यावर शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

          मात्र,शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा व इतर मागण्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांसोबत सकारात्मक झाला नाही तर उद्या महाराष्ट्र राज्यात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..

      तद्वतच दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांच्या सुव्यवस्थेचा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

        पाऊस सुरु असतानाही भर पावसात व चिखलात आंदोलक शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत.