Home Maharashtra नगरसेविका पतिची दबंगगिरी…… — चक्क महिला अभियंत्याला दिली धमकी!

नगरसेविका पतिची दबंगगिरी…… — चक्क महिला अभियंत्याला दिली धमकी!

      पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज-वडसा..

            दखल न्यूज भारत…

         देसाईगंज नगर परिषदेत सध्या कंत्राट मिळावे यासाठी काही नगर सेवक/सेविकांचे आप्तेस्ट कमालीची धावपळ करतांना दिसत असुन एका नगर सेविकेच्या पतिने कंत्राट आपल्या मर्जिनूसारच करवुन घेण्याच्या भानगडीत संबंधीत विभागाच्या महिला अभियंत्याला धमकावले असल्याची खमंग चर्चा देसाईगंज शहरात वणव्या सारखी पसरत असुन यावर सत्ता पक्ष काय निर्णय घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

      स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला सबलीकरणाला चालना मिळावी यासाठी ५०% आरक्षण घोषित केले आहे. यामाध्यमातुन महिला राजकिय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा ही उमटवितांना दिसत आहेत.

        अनेक ठिकाणी सदस्य असलेल्या महिलांचे पतीच अधिकार व पदाचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे महाराष्ट्र शासनाने परिपत्राक काढुन पतीदेवांवर लगाम कसण्याचा निर्णय घेतलाय.

       त्यात असे कृत्य आढळुन आल्यास महिला सदस्याचे पदही जाणार असे सक्त निर्देश असतांना सुध्दा महिला सदस्यांचे पतीच फुकटचा कारभार करण्याच्या भानगडी घडत असुन असा प्रकार देसाईगंज नगर परिषदेत परवा पहावयास मिळाला. 

        एका विशिष्ट विभागाच्या साहित्य खरेदी करिता मी सांगितल्या प्रमाणेच कंत्राट तयार करावा लागेल अशी दमदाटी देत त्या महिला अभियंत्याला,”तु काय करु शकशिल तुझ्यासारखे छप्पन पाहिले,,अश्या एकेरी भाषेचा वापर करुन प्रशासकिय कामात अडथडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

        सदरचे प्रकरण सत्ता पक्षाच्या गटाकडुन झाल्याचे समजते.त्यामुळे सेवाभावी प्रवृत्ती चे अनेक सदस्य व पदाधिकारी नगर परिषद शासनात असतांना एवढ्या घृणास्पद प्रकारावर पांघरुण कसे घालण्यात आले?

        यावर देसाईगंज शहरात खमंग चर्चेला उधाण आल्यानेच राजकिय दबावापोटी सदर महिला अभियंता सुट्टीवर गेल्याचे समजते.

        या प्रकरणाची माहिती देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी यांच्याकडून जाणून घेतली असता त्यांनी असला प्रकार घडल्याची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली नसल्याचे सांगुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. 

         सदर प्रकरणा विषयी संबंधीत महिला अभियंत्याला विचारणा केली असता घाबरलेल्या मनस्थितीत मी हा प्रकार फोन वर सांगू शकत नाही असे उत्तर दिले. 

         यावरुन सदरचे प्रकरण अतिशय गंभिर स्वरुपाचे असेल याची कल्पना येतंय.या महाशयाने प्रभागातील एका चोरीच्या प्रकरणात पोलिस प्रशासनाला एवढे हैराण केले की,त्यामुळे चक्क उपविभागिय पोलिस अधिकारी यांना घटना स्थळावर येऊन कसोसिचे प्रयत्न करावे लागले होते. 

        एवढे करुन ही या पोस्टरछाप स्वयंघोषित नेत्याला समाधान न झाल्याने,”वरिष्ठ अधिकारी उद्धटपणे वागल्याने मोठी अनर्थ घटना टळली.

         पदाधिकारी निर्वाचित सदस्य असल्याने त्यांनी स्वत: नगर परिषद क्षेत्रातील समस्या जाणुन घेऊन त्यावर तोडगा निघावा,नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे अपेक्षित असतांना केवळ आपली पत्नि पदाधिकारी असल्याने त्या पदाचा अनादर करत तिच्या वैयक्तिक कर्तव्याच्या अधिकारांवर गदा आणुन आपणच सर्व अधिकारांचे मालक आहोत,असा आव आनुण प्रशासकिय यंञणेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेचा वापर करुन दमदाटी देणे हे कितपत योग्य आहे?

        या सर्व प्रकारावर प्रशासकीय अधिकारी व नगरपरिषदेतिल सत्ता पक्षाने आत्ममंथन करणे गरजेचे असुन अश्या प्रकरणावर लगाम न लावल्यास देसाईगंज शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडायला वेळ लागणार नाही अशी लोकचर्चा आहे.. 

         केवळ भिती पोटी की,काही गौड बंगाल असल्यामुळे तक्रार दाखल करण्यात असमर्थता? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन या प्रकरणाची खमंग चर्चा शहरात वणव्या सारखी पसरु लागली आहे.