बायोडायनॅमिक कंपोस्ट खत व सी.पी.पी. कल्चर वर अनिल किरणापुरे यांनी दिला प्रात्यक्षिक.. — आत्मा अंतर्गत युवा सेंद्रिय शेतकरी बचत गटांचा उपक्रम .

संजय टेंभुर्ने 

कार्यकारी संपादक 

 

     साकोली तालुका कृषी विकास शेतकरी फार्मर प्रोडूसर कंपनी व आत्मा अंतर्गत साकोली तालुक्यात 50 शेतकरी गटांना 500 एकर मध्ये सेंद्रिय शेती प्रकल्प राबवित असल्याने गटा-गटात S9 बायोडायनमिक कंपोस्ट व सी.पी.पी. कंपोस्ट या सर्व गटांना प्रत्याशिक देणे सुरू आहे.

लवारी मध्ये युवा सेंद्रिय शेतकरी बचत गटा च्या माध्यमातून प्रात्यक्षिक करताना गटाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे, मुखरू शेंडे, राजकुमार किरणापुरे ,प्रकाश क्षीरसागर ,शालिक टेंभुर्ण, गोपीचंद किरणापुरे, मनोज किरणापुरे, पुरुषोत्तम राऊत, युवराज किरणापुरे ,चंद्रशेखर कापगते ,भैया श्रीरंगे ,केशव लांजेवार आदी शेतकरी उपस्थित होते.

प्रात्यक्षिक देताना अनिल किरणापुरे म्हणाले की, शेतामध्ये सततच्या रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाल्याने येणारा उत्पन्न समाधानकारक दिसत नाही.त्यामुळे जमिनीला जैविक खत जसे की बायोडायनिक कंपोस्ट खत व सीपीपी कल्चर , हिरवळीचे खताचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे शेतामध्ये आपण एनपीके व्यतिरिक्त जमिनीला काहीच देत नाही आणि पिकांला 72 प्रकारचे मायक्रो न्यूटन खताची गरज असते आणि ते या खतापासून मिळू शकते याप्रसंगी सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केले की मातृभूमी वाचवा मिशनमध्ये सहभाग होऊन विसमुक्त अन्न तयार करा असे ते बोलत होते.