1 मई ला आरोग्य तपासणी शिबीर आणि आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीराचे आयोजन.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान: – कन्हान येथे सोमवार दिनांक १ मई महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस निमित्य शहर विकास मंच कन्हान द्वारे भव्य मोफत आरोग्य शिबीर , आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर आणि कामगारांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या भव्य मोफत आरोग्य शिबीरात अरिहंत हाॅस्पीटल सुपर स्पेशालिटी सेंटर नागपुर येथील डाॅक्टरांचा , चमुंच्या सहकार्याने दमा , अस्थमा , बीपी , शुगर , ईसीजी , डोळे तपासणी , सह आदि विविध प्रकारच्या बीमारीची तपासणी करण्यात येईल , तसेच संपुर्ण परिवार करिता रुग्णालयात बिलात सवलत , औषधांवर सवलत , तपासणी केंद्रावर सवलत , वैद्यकीय सल्लामसलत वर सवलत , मोफत वैद्यकीय माहिती , आरोग्य शिबीरांची माहिती , सर्व उपयोगी सुविधा मिळविण्याकरिता फक्त 120 रुपयात आरोग्य (हेल्थ) कार्ड बनवुन वाटप करण्यात येणार आहे . तरी शहरातील , ग्रामीण भागातील नागरिकांनी या भव्य शिबीराचा लाभ घ्यावा असे कडकडीचे आव्हाहन कन्हान शहर विकास मंच चे पदाधिकारी , सदस्यांनी नागरिकांना केले आहे .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , कार्याध्यक्ष योगराज आकरे , उपाध्यक्ष भुषण खंते , वरिष्ठ मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव अरविंद कटाले , कोषाध्यक्ष प्रकाश कुर्वे , प्रकाश केवट , विनोद खडसे , विलास दुधबावने , पुरुषोत्तम ऊके , शाहरुख खान , सह आदि मंच पदाधिकारी परिश्रम घेत आहे .