देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १०० वा. “मन की बात” कार्यक्रम संपन्न.. — खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे स्थळ होते गडचिरोली..

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

गडचिरोली

      सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून अभिवादन करत “मन की बात” या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता की जय ! या जयघोषाने करण्यात आली. 

     देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा १०० वा भाग ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रभाग-०५ बुथ क्रमांक- ९८ छत्रपती शाहूनगर शक्तीकेंद्र परिसरात खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात निवासस्थान कार्यालय गडचिरोली येथे थेट प्रक्षेपण “मन की बात” १०० वा.भागाचा कार्यक्रम करण्यात आला.

    “मन की बात” हा कार्यक्रम लोकसभा क्षेत्रात प्रत्येक बुथ वर, शक्तीकेंद्रावर व मंडळावर तसेच सर्व नागरिक जनता मोठया उत्साहाने, आनंदाने पदाधिकारी, कार्यकर्ते,भाजपाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुखांनी,आयोजित करुन बघितला त्यामुळे निश्चितच या कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वानी घेतला.त्या करिता मी अशोक नेते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार या नात्याने,त्यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच ०१ मे या महाराष्ट्र दिनाच्या सर्व समस्त जनतेला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

     याप्रसंगी “मन की बात” या कार्यक्रमाला प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे,ज्येष्ठ नेते तथा प्रदेश किसान आघाडी चे सदस्य रमेशजी भुरसे,वि.भटक्या जमातीचे जिल्हा महामंत्री गोवर्धन चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे,माजी उपाध्यक्ष अनिल पोहनकर,युवा मोर्चा उपाध्यक्ष दिपक सातपुते,नंदूजी काबरा,बेहरे आर्ट, युवा मोर्चा चे खडसे, माजी सरपंच चितरंजनपुरचे मनोरंजन हलदार,कोरेगांवचे उपसरपंच धनंजय तिरपुडे, रूषि गायकवाड,व्याहाड बुजचे भाजपा कार्यकर्ते माणिक वासेकर,कृष्णा मलिक, सुनील विश्वास, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे,तसेच पत्रकार बंधू,मीडियाचे व पोर्टलचे बंधू उपस्थित होते.