Home Breaking News ब्रेकिंग न्यूज…. — अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर बापलेक जखमी… ...

ब्रेकिंग न्यूज…. — अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर बापलेक जखमी… — विहिरगाव फाट्यावर झालाय भिषण अपघात…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     भंडारा जिल्हातंर्गत तालुक्याचे स्थळ असलेल्या पवनी येथील जुमडे परीवार आपल्या बाईक ने चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिपर्डा येथे नातेवाईकांच्या घरी वास्तू कार्यक्रमासाठी आले होते.

       घर वास्तूचा कार्यक्रम झाल्यानंतर ते परतीच्या मार्गाने पवनी कडे निघाले असता चिमूर तालुक्यातील मौजा विहिरगाव फाट्यावर भिषण अपघात झाला.

      या अपघातात सौ.रिया उर्फ प्रिया राकेश जूमडे वय २८ वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर श्री.राकेश ताराचंद जुमडे वय ३७ वर्ष,कुमार अद्वित राकेश जूमडे वय ४ वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.

    मौजा विहिरगाव येथील चारचाकी चारचाकी वाहन चालक निलेश रंदये यांना गाडीचा वेग कमी करता आला नसल्याने त्यांनी दुचाकी स्वारांना आवकजावक असलेल्या चिमूर-मासळ-विहिरगाव- पळसगाव -पिपर्डा ते सिंदेवाही मार्गातंर्गत मौजा विहिरगाव फाट्यावरुन शेतात चिरडत नेले असल्याची गंभीर व हृदयद्रावक घटना घडली.

     चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.३३,एफ.५१५१ असा आहे.निलेश रंदये यांनी चारचाकी वाहनाने कसा काय अपघात केला? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

        चिमूर पोलिसांनी वाहनचालक निलेश रंदये यांना त्वरित ताब्यात घ्यावे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.