प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
आज १२ वाजता पर्यंत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही तर विविध ठिकाणचे रेल्वे मार्ग रोखणार असल्याचे व विमानांचे आवागमन बंद करणार असल्याचे माजीमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे…
कर्जमुक्ती आंदोलनात शेतकरी प्रचंड प्रमाणात सहभागी झाले असून,परत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत..
लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोण करेल?हा प्रश्न आता आवासून उभा ठाकला आहे.महाराष्ट्र राज्यातील मायबाप शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आंदोलन करायला महाराष्ट्र सरकारने भाग पाडले असून त्यांना उपवाशी ठेवण्याचे महापाप सुध्दा महाराष्ट्र सरकार करणार आहे काय?हा मुद्दा आता महाराष्ट्रभर पेट घेणार आहे..

पंजाबच्या धर्तीवर आंदोलन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या बाजूने आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी एकजुट दाखवणे गरजेचे आहे.
याचबरोबर महाराष्ट्र पोलीसांनी शेतकऱ्यांना हात लावला व त्यांनी थोडी जरी इजा शेतकऱ्यांना केली तरी त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बाबत वारंवार खोटे बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,त्यांचे मंत्री,आमदार हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने चव्हाट्यावर आले असून त्यांची फालतुगिरी आता कामी पडणार नाही एवढे निश्चित झाले आहे.
आज १२ वाजता पर्यंत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बाबत निर्णय घेते की पुन्हा एकदा घुमजाव करते हे १२ वाजता नंतर कळेलच!
परंतु स्वतःच्या फालतुगिरीत अडकलेले महाराष्ट्र सरकार कर्जमुक्ती शिवाय सुटकेचा श्वास घेवू शकत नाही असे स्पष्ट झाले आहे…


