Home देशविदेश पारध्याची शिकार…

पारध्याची शिकार…

           ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे,परंतु या गोष्टीचा मतितार्थ किंवा अन्वयार्थ अजून कळलं नाही किंवा कळला असला तरी त्यानुसार माणसांचे परिवर्तन घडलेले दिसत नाही.म्हणून परत एकदा ही गोष्ट सर्वांच्या ध्यानी आणून देण्याची आवश्यकता वाटली.तर ही गोष्ट अशी. 

         एक पारधी असतो,पारधी म्हणजे पारधी जात नव्हे तर शिकारी होय.तो पारधी गाय पाळतो,ती पूजा करण्यासाठी नाही,किंवा तिच्यापासून मिळणारे शेण विकून पैसे करणे किंवा दूध विकणे किंवा त्या दुधाचा कुटुंबासाठी उपयोग करणे किंवा गायीपासून मिळणाऱ्या बछड्यांना वाढवून ते विकून पैसे मिळवणे या उद्दिष्टासाठी तो ती गाय पाळत नाही.

          तर पाखरांची शिकार करण्यासाठी तो ती गाय पाळतो,म्हणजे त्या गाईचा वापर करतो. 

        नित्य नियमाप्रमाणे तो ती गाय आणि बाण किंवा गुल्लेर आणि एक पिशवी घेऊन पाखरांची शिकार करण्यासाठी जात असतो,तो रानात जातो,एखादे मोठे झाड पाहतो,त्यावर पक्षी बसलेले आहेत याची खात्री करतो,आणि त्या झाडापासून थोड्या अंतरावर जमिनीवर धान्य फेकतो किंवा पसरवितो,आणि थोड्या अंतरावर जाऊन गायीच्या आडोशाला लपून बसतो.

         झाडावरील पक्षी हे कोल्ह्याच्या बुद्धीचे नसतात,साधे भोळे असतात.भुकेलेले असतात,त्यांना अन्नाची गरज असते,मग झाडावरल्या पक्षांची नजर खाली जमिनीवर फेकलेल्या धान्यावर जाते,आणि झाडावरील सर्व पक्षी जमिनीवर उतरतात,आणि घाई घाईने दाणे टिपायला सुरुवात करतात,दाणे टिपण्यामध्ये सर्व पक्षी जेव्हा गुंग असतात तेव्हा गायीच्या मागे आपल्याला पारधी हळूच आपल्या भात्यातील बाण करतो आणि पाखरांकडे नेम धरून मारतो आणि पाखरांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यातील एकातरी पाखराला तो बाण लागतो.

       यामुळे आत्ताच सर्व पाखरे उडून परत झाडावर जाऊन बसतात,आणि हा शिकारी तिथे विव्हळत पडलेल्या पक्षाला घेऊन आपल्या पिशवीत टाकतो, आणि परत गायीच्या आडोशाला जाऊन दबी धरून उभा राहतो. 

          गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात.तसेच भुकेल्या पोटी माणसाला कोणतेही तत्त्वज्ञान सांगा ते समजत नाही असे म्हटले जाते,तसेच अज्ञानी,अडाणी,देव भोळे,धर्मभोळे,साधेसुधे आणि निष्पाप माणसे की ज्यांना काहीच आज तेच समजत नाही,राजकारण कळत नाही,फायदा नुकसान म्हणजे काय याचे पण ज्ञान नाही,असे लोक नेहमीच फसत असतात.

         याप्रमाणेच झाडावर बसलेले ते पक्षी भुकील्या पोटाची खळगी भरण्यासाठी परत जमिनीवर उतरतात आणि पटापटा दाणे टिपायला लागतात,त्यांना आपल्यातील एका पक्षाला एका शिकाऱ्याने शिकार करून मारले त्यास तो घेऊन गेला,हे विसरून जातात,कारण ते विसरभोळे असतात,शिवाय रिकाम्या पोटाची खळगी असा प्रसंग विसरण्यास त्यांना भाग पाडते.

         त्यांना आता जवळ कोणीच नसून फक्त गाय आहे असे वाटते,पण त्या गायीच्या आडोशाला एक शिकारी आपली शिकार करण्यासाठी दबी धरून बसलेला आहे,हे त्यांच्या लक्षात येत नाही,गाईला पुढे करून,गायीच्या आधाराने तो आपली शिकार करणार आहे,नवे त्यांनी आपली शिकार केलेली आहे हे पण ही पाखरे विसरतात.

          म्हणून केवळ आपल्या पोटासाठी ते जमिनीवर उतरतात आणि तेथील धान्य टिपायला सुरुवात करतात,गर्दी करून घाई घाईने धान्य टिपण्यात.जेव्हा सारी पाखरे गुंग असतात अशावेळी परत तो पारधी आपल्या भारतातील बाण काढून पाखरांच्या दिशेने सोडतो आणि त्यातील परत एकदा एक पाखरू जखमी होते,मी ओळख पडते आणि सारी पाखरे झाडावर जाऊन बसतात,हा नित्यक्रम,रोजचाच कार्यक्रम,रोजचेच वर्तमान ,रोजच एकाचे मरण असते.

       परंतु याचे भान मात्र त्या भुकेल्या आणि साध्या भोळ्या पाखराला असते,कधीच भानावर नसतात म्हणून ते सतत फसतात. 

        मरतात,आपल्या डोळ्यादेखत,आपल्यातीलच एक एक जन मरतो आहे,किमान एवढी अक्कल सुद्धा त्या पाखरांना येत नाही,म्हणून रोज चे मरण याबद्दल त्यांना त्याची काहीच वाटत नाही.अशी ही विदारक परिस्थिती. अ

        शाच परिस्थितीत त्या पाखरांच्या पिढ्यानपिढ्या जीवन जगत आहेत.तीच पाखरे,तेच झाड,तीच गाय,तोच पारधी,तीच ज्वारी,आणि रोज काही जणांचे नव्हे अनेकांचे तेच ते मरण या सगळ्याची जणू त्यांना सवयच झालेली असते.

          म्हणजेच तसे संस्कार त्यांच्यावर झालेले असतात,यातूनच त्यांची केविलवाणी मानसिकता तयार होते.

       ” पारध्याची शिकार “ही गोष्ट आम्ही ऐकत आलेलो आहोत,आणि या गोष्टीतील त्या पाखरांची केविलवाणी मानसिकता जशी झालेले आहे त्याप्रमाणेच आपली पण मानसिकता झालेली आहे,ही गोष्ट केवळ त्या पाखरांची नसून ही गोष्ट आपली सुद्धा आहे. 

       या गोष्टीतील अवस्था आणि व्यवस्था आपली सुद्धा आहे.या गोष्टीतील मतितार्थ आणि अन्वयार्थ म्हणजेच या गोष्टीची शिकवण जोपर्यंत आपल्या गळी उतरत नाही,तोपर्यंत ” माझे मरण मी पाहिले डोळा ” असेच म्हणत जगावे लागणार आहे. 

कथा सादर करते :- दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक :- 29 ऑक्टोबर 2025. फोन: 9420912209.