डीपी वरील ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विज पुरवठा बंद.. — महावितरणचे उडवा उडवीची उत्तरे,रब्बी पिके धोक्यात.. — शेतकरी म्हणतात आम्ही आत्महत्या करावी काय?

 युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक 

         खल्लार महावितरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या म्हैसपूर मोचर्डा शेत शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने या परीसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विज पुरवठा पाच ते सहा महिन्यापासून बंद आहे.मात्र याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असून शेतकऱ्यांना उडवा उडवीची देत आहे.

           नुकताच सोयाबीन पिकाचा हंगाम संपला असून पुढे आता रब्बी पिकांचा हंगाम सुरु होणार आहे.रब्बी पिकांसाठी शेताला बोअरचे पाणी देण्यासाठी म्हैसपूर मोचर्डा शेतशिवारात डीपी असून या डीपी वरुन आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतात विज पुरवठा आहे.

         तसेच कोरडवाहू शेतकरीही इतर शेतकऱ्याच्या शेतातून रब्बी पिकांसाठी पाणी घेतात.सदर जळालेले ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे यासाठी येथील शेतकरी हे खल्लार महावितरण कार्यालयात गेले असता महावितरण कार्यालयाकडून तुमच्या आधी ४० ट्रान्सफार्मर जळाले असून तुमचा नंबर ४१ वा आहे असे उडवा उडवीची उत्तरे दिल्या गेली.

          तोपर्यंत रब्बी पिकांची वेळ निघून गेलेली असेल.आधीच यावर्षी कमी पावसाळा त्यात सोयाबीन पिकाने दगा दिला.आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकावर अवलंबून आहे.अशावेळी जर शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी महावितरण ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देत नसेल तर संबंधित शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.