श्रीगुरु बापूसाहेब देहुकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

              निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळ्यास प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त रविवार दिनांक 29/10/2023 रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय गाथा ग्रंथाचे पूजन गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज व त्यांच्या सुविद्या पत्नी सौ. रजनी बापूसाहेब देहुकर, गुरुवर्य सोहम बापूसाहेब देहुकर, सौ.रविना सोहम देहुकर ,सौ स्नेहल सौरभ देहुकर, या सर्वांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. तसेच निरा नरसिंहपूरचे विद्यमान सरपंच सौ अर्चना नितीन सरवदे व सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे यांच्याही हस्ते ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

            या कार्यक्रमासाठी हजारो संख्येने टाळकरी मृदुंग वादक भाविक भक्त आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच आळंदी व देहू संस्थांचे सर्व पदाधिकारी या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे आहेत तसेच श्री शेत्र निरा नरसिंहपुर सप्ताह कमिटीच्या वतीने परीसरातील शंभरहून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे. सप्ताहासाठी रविवार दिनांक 29 /10 /2023 रोजी सायंकाळी श्री गुरु कानोबा महाराज देहुकर पंढरपूर यांची कीर्तन सेवा झाली तर सोमवार दिनांक 30 /10 /2023 ला ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच मंगळवार दिनांक 31/ 10 /2023 रोजी ह भ प महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची कीर्तन सेवा होईल बुधवार दिनांक 1/ 11 /2023 रोजी श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले धामणगाव यांची कीर्तन सेवा होईल.

          गुरुवार दिनांक 2/ 11/2023 रोजी श्रीगुरु केशव महाराज नामदास पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा होईल. शुक्रवार दिनांक 3/11/2023 रोजी ह भ प श्री गुरु योगीराज महाराज गोसावी पैठण यांची कीर्तन सेवा होईल शनिवार दिनांक 4/ 11/2023 रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम क्षेत्र आळंदी यांची कीर्तन सेवा होईल.

               शेवटी रविवार दिनांक 5/11/2023 रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीमध्ये संपूर्ण गाव दिंडी प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या आवाजात घेण्यात आल्यानंतर सकाळी 9 ते11 या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल व सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देऊन सप्ताहाची सांगता होईल.