व्याहाड बुज येथील श्री.संतोष बालाजी मेश्राम यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तर अल्का बंडू कोडापे यांची सचिवपदी बिनविरोध निवड.. — बिनविरोध नियुक्ती बाबत हार्दिक अभिनंदन…

 

सावली:-(सुधाकर दुधे)

तालुक्यातील व्याहाड बुथ येथील नव भारत विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय येथे आज दिंनाक २९ ऑगस्ट २०२३ ला शिक्षक- पालक समितीची सहविचार सभा घेण्यात आली.

       या सहविचार शिक्षक पालक सभेत पालकांनी आपल्या पाल्यांच्या समस्या सांगीतले जाते,पालक सभेला पालकांनी येणाऱ्या अडीअडचणी सांगतात,शिक्षक हा विद्यार्थांचा केंद्रबिंदु आहे.या पालक सहविचार सभेला शाळा संबंधित काही अडीअडचणी सोडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून शाळा व्यवस्थापन समितीची कमेटी गठित केली जाते.

          या शाळा‌ समिती मार्फतच समस्या सोडविले जाते.या साठी अध्यक्ष व सचिव यांची निवड केली जाते.

           झालेल्या शिक्षक पालक सहविचार सभेला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी व्याहाड बुजचे सुशिक्षित, सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष बालाजी मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर अल्का बंडू कोडापे यांची सचिव पदी बिनविरोध नियुक्ति करण्यात आली.सदस्या सौ.वच्छला गोपीनाथ पेंदोर यांनी नियुक्ति झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

           या शिक्षक पालक सहविचार सभेत सुचक रविंद्र निकेसर यांनी नाव अध्यक्ष म्हणुन संतोष मेश्राम यांचे नाव सुचविले यात कुणाचाही आक्षेप न होता बिनविरोध निवड करण्यात आली.

        व्याहाड बुजरुक येथे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही निवड एका सामान्य कुटुंबात सुशिक्षित, चांगले व्यक्तिमत्व असलेल्या, सामाजिक जाण असणाऱ्या अशा व्यक्तींची नियुक्ति झाली.हि कौतुकास्पद आहे असे मत व्याहाड बुजचे ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गेडाम यांनी व्यक्त करून हार्दिक अभिनंदन केले.

         निवडीचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन करतांना ग्रामपंचायत सदस्य तथा खासदार अशोकजी नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र निकेसर, ग्रा.प.सदस्या वैशाली निकेसर,ग्रा. प.सदस्या पुष्पा ठाकरे,ग्रा.प.सदस्या प्रणिता तोडेवार,रामभाऊ गेडाम, महादेव गेडाम,रघुनाथ गेडाम,अक्षय निकेसर, उपस्थित होते.

            निवडीचे श्रेय शिक्षक प्राचार्य भगत सर,गव्हारे सर, पावडे सर,शेंडे सर, शंकर मेश्राम सर,व इतर शिक्षकवृंद यांना दिले.