Home देशविदेश अती उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतीकृती चेहऱ्यांवर उधळला गुलाल,भान ठेवून तर...

अती उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतीकृती चेहऱ्यांवर उधळला गुलाल,भान ठेवून तर गुलाल उधळायला हवे होते?  — सर्व जनतेने पाहिलाय उघड्या डोळ्यांनी साकोली येथील असभ्य वर्तणूकीतील प्रकार आणि नागरिक बोललेच!

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

 

साकोली : नुकत्याच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या.त्या निमित्ताने मुख्य शहरातील जून्या पंचायत समिती कार्यालय येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना विजयी उमेदवारांनी मोठ्या उत्साहात पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करीत अभिवादन केले. 

      परंतू या रॅलीमधे काही अती उत्साही युवकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला त्यांच्या डोक्यावरून चक्क गुलाल रंगांची थैली पालथी केली. 

       या प्रकाराने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चेहरा पूर्णतः अदृश्य होत त्यांचे डोळेही झाकले गेलेत.हा प्रकार उघड्या डोळ्यांनी सर्व जनतेंनी पाहिला व हे बरोबर नाही असे बोलूनही गेले. 

       मात्र ज्या खुळचट लोकांनी चक्क गुलालाच्या रंगाची थैलीच पुतळ्यावर पालथी केली त्यांनी हा थोर महापुरुषांच्या पुतळ्याला तातडीने जाऊन स्वच्छ करण्यासाठी धाडस दाखविले नाही. 

       तर रात्री सुमारे ८ वा. पर्यंत हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा तसाच रंगून होता व चेहरा विद्रूप करून होता.हे कितपत योग्य आहे.? 

       एकीकडे पाहिले तर भारतीय संविधान रचियता महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,शिक्षणक्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज,महाराष्ट्राची आन बाण शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तरी पुतळ्याला असा भरमसाठ गुलाल उधळून त्यांचे चेहरे तरी विद्रुप करतात का कधी.? 

        मग भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राष्ट्रधूरीन असलेले महात्मा गांधी,आज प्रत्येक भारतीय राजमुद्रेवर (नोटांवर) ज्यांची फोटो आहे अश्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासोबतच असा रंगोत्सव करून त्यांचेच डोळे झाकण्याचा प्रकार योग्य तरी वाटतो का.?असा सवाल काल रात्रोला म्हणजे २८ जुलैला उपस्थित जनतेने केलाय…