Home Maharashtra वनसंरक्षक जाॅईग जाॅर्ज सोबत आमदार रामदास मसराम यांनी केली विविध विषयांवर चर्चा…...

वनसंरक्षक जाॅईग जाॅर्ज सोबत आमदार रामदास मसराम यांनी केली विविध विषयांवर चर्चा… — आमदार कार्यालयात झाली चर्चा…

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी

      आमदार श्री.रामदास मसराम यांनी सहाय्यक वनसंरक्षक जॉईग जॉर्ज यांच्या सोबत वन विभागातील विविध कामांचा आढावा देसाईगंज येथील संपर्क कार्यालयात घेतला. 

      यावेळी जंगल परिसरात वन्यप्राण्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या वन तलावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

      उन्हाळ्याच्या काळात वन तलावांना पाणी कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून दिले जाते,तसेच पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास कोणती उपाययोजना करण्यात येते याबाबत आमदार श्री.रामदासजी मसराम यांनी माहिती घेतली. 

      वन तलावांना वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही तर हिंसक वन्यप्राणी जंगलाबाहेर येऊन गावांकडे वळण्याची शक्यता वाढू शकते,त्यामुळे याबाबत कोणतीही निष्काळजीपणा होऊ नये,अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

       वन्यजीव व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.