स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई… — दुचाकीसह केला 1,67,200/- रुपयाचा माल जप्त..

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

  दिनांक 27/05/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा विहीरगाव येथील चौकात सापळा रचुन अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची वाहतुक करणारे ईसम नामे लाखबिरसिंग बावरी व भुषण मेश्राम यांना ताब्यात घेतले असता, त्यांचेकडे 87,000/- रु. किमीचा देशी व विदेशी दारु, दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेली 60,000/- रुपये किमतीची दुचाकी तसेच 20,000/- रु. किमतीचा मोबाईल असा एकुण 1,67,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्ह्राचा तपास सुरु आहे.  

   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. तसेच पोनि उल्हास भुसारी, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोना/अकबर पोयाम, पोशि/प्रशांत गरफडे, पोशि/श्रीकृष्ण परचाके, पोशि/श्रीकांत बोईना, चापोना/शगीर शेख यांनी पार पाडली.