संजय डोंगरे यांच्या हळद पिसाई चक्कीच्या पट्यात हात सापडल्याने झाला निकामी.. — उपचारासाठी गरीब तरुणाला आर्थिक मदतीची त्वरित गरज..

 

    दिक्षा कऱ्हाडे

मुख्य कार्यकारी संपादक 

          हळद पिसाई करणाऱ्या चक्कीच्या पट्यात विलास तुकाराम बनकर याचा हात सापडल्याने रक्तबंबाळ होऊन निकामी झाला असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.

         चिमूर तालुक्यातंर्गत मौजा नेरी येथील संजय डोंगरे हे प्रतिष्ठीत राजकीय व सामाजिक नागरिक आहेत.त्यांच्या मालकीच्या हळद पिसाई करणाऱ्या चक्कीवर मौजा नेरी (गुरुदेव वार्ड) येथील रहिवासी विलास तुकाराम बनकर हा युवक रोजंदारीने कामावर होता.

          हळद पिसाई करतांना सुरू असलेल्या चक्कीच्या पट्यात हात सापडल्याने चेंदामेंदा झाला व निकामी झाला.

            सदर युवक हा गरीब असून त्याच्याकडे उपचारासाठी रुपये नाही.सदर युवकाचा योग्य उपचार करण्यासाठी त्याला तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.आर्थीक दानदात्यांनी त्याला तात्काळ आर्थिक मदत करुन उपचारासाठी सहकार्य करावे अशी आर्त हाक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आहे.

         विलास तुकाराम बनकर यांच्यावर सध्या चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

             अपघातग्रस्तांचा संपर्क क्रमांक :- ७७९८७७१७८४ असा आहे.. मदत करु इच्छिणाऱ्यांनी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन सहकार्य करावे अशी कौटुंबिक सदस्यांची विनंती आहे..