अमरावती क्रुषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडी व यशोमती ठाकूर यांनी उडवला राणा दाम्पत्याचा धुव्वा !… — आमदार बंधू सुनील राणाही पराभूत…

   युवराज डोंगरे

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडी व यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. तर आमदार रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

अमरावती बाजार समिती निवडणूकीत आमदार रवी राणा आणि भाजपच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने १८ पैकी १८ ही जागा जिंकून विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला आहे. आमदार रवी राणा गटाला एकही जागा जिंकता आली नाही हि खूप मोठी नामुष्की आहे.तर महाविकास आघाडी व यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.