Home Social शिक्षक बँक संचालकां विरोधातील प्रभाकर झोड यांचे उपोषण आमदार प्रविण तायडे यांनी...

शिक्षक बँक संचालकां विरोधातील प्रभाकर झोड यांचे उपोषण आमदार प्रविण तायडे यांनी सोडविले…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

         अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळा विरोधात तातडीने कार्यवाही करावी, दि. 3 मार्च 2025 रोजी उपविधी संदर्भात चुकीच्या पद्धतीने जारी केलेला आदेश तातडीने रद्द करावा.खरेदी आणि इतर निविदा प्रक्रिया संदर्भात शासकीय ऑडिट करावे, नोकर भरती संदर्भात न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी.

          यासह एकूण अकरा मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कांतानगर, अमरावती यांचे कार्यालय समोर शिक्षक बँक विकास आघाडीच्या वतीने माजी संचालक प्रभाकर झोड आमरण उपोषणाला बसलेले होते.

        उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रविण तायडे यांचे निर्देशानुसार अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना जनता दरबारामध्ये आंदोलनकर्त्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याचे हस्तक्षेपानंतर विभागीय सहनिबंधक प्रविण फडणीस यांनी मागण्या मान्य केल्याचे लिखित पत्र देत असल्याबाबत आश्वासित केले.

          यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विभागीय उपनिबंधक चैतन्य नासरे, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी लिखित पत्र उपोषणकर्त्यांना सादर केले. त्यानंतर आमदार प्रविण तायडे यांनी उपोषण स्थळी जाऊन प्रभाकर झोड यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण यशस्वी पद्धतीने सोडविले.

         शिक्षक बँक विकास आघाडीच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून शिक्षक बँकेतील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा देणाऱ्या पाचही संचालकांच्या हिमतीला आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वांना देण्यात आली.

          यावेळी आंदोलन यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण तायडे , विभागीय उपनिबंधक चैतन्य नासरे, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, आणि बँक विकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले होते.

           सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे नेते किरण पाटील, महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे नेते प्रमोद ठाकरे, मंगेश खेरडे, मनोज चौरपगार, गौरव काळे संजय नागे, निळकंठ यावले, गजानन चौधरी, गजानन कळंबे, सुभाष सहारे, अशोक चव्हाण, दत्तप्रसाद भेले, विनोद खाकसे, सतिश गुजरकर, संजय साखरे, अजय साव, सुनिल भावेकर, दिनेश देशमुख, शकील अहमद, आशिष देशमुख, धनराज कुंजेकर, राजा डाफ, विश्वजीत ठाकरे, प्रियंका ठाकरे, संदीप देशमुख, उज्वल पंचवटे, सतिश डोंगरे, राजू खिराडे, अण्णा कडू, गजानन निचत, संजय वाटाणे, राजाभाऊ तामसकर, राजाभाऊ होले, दिनेश भागवत, सतिश नांदणे, नरेंद्र धनस्कर, रणधीर वानखडे, प्रविण सोनार, रामप्रसाद चिमोटे,रामेश्वर पजई, मनीष टेंभरे, संतोष कोठले, मंगेश वाघमारे,सुनिल बागडे, संदीप घाटे, मदनगोपाल तिवलकर, सुधीर गुल्हाने, नितीन वाटाणे, सोमेश्वर खानंदे, प्रणय त्रिपाठी, ऋषिकेश कोकाटे, रविकिरण सदाशिव, चंद्रशेखर रामटेके, डॉ. ज्ञानेश्वर मोहोड, ज्ञानेश्वर सावरकर, सुधीर नितनवरे, दादाराव कळमकर, नंदकिशोर रोकडे, ज्ञानेश्वर डवरे, सुरेश भुयार, उमेश उदापुरे, भूषण ठाकूर, मदनलाल उमप, सुनिल गोटे, चक्रधर ढवळी, सौ सुनिता पाटील, वृषाली देशमुख, माधुरी झोड, मंजुषा कोरडे, ज्योती खैरे, उषा खाटकडे, वंदना पडोळे, नरेंद्र जोशी, त्रिशला इंगळे, रत्नमाला ठाकरे, भास्कर आखरे, प्रफुल भोरे, श्रीकृष्ण लांजेवार, अविनाश आढाव, सुनील तायडे, देवराव आमोदे, अजय राऊत, कमलेश चौधरी, श्रीकांत बाभुळकर अनुराग हिरुळकर, विनोद दळवी, संजय पडोळे, गौतम विरघट, सतिश तायडे, अक्षय खरकाडे, योगेश पखाले राजीव बोंडे विवेक वांगे मनोहर पवार, अनुप डिके, संदीप आठवले, सुनिल घरडे, सुधीर बदुकले, राजेंद्र सावरकर, दिपक महल्ले, प्रा. लक्ष्मण खैरे गजानन घारड या जिगरबाज कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.