Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — दुचाकीची पुलाच्या कठळ्याला धडक,तिन तरुण जखमी..  —...

ब्रेकिंग न्यूज… — दुचाकीची पुलाच्या कठळ्याला धडक,तिन तरुण जखमी..  — धानोरा-मुरुमगाव मार्गावरील टवेटोला गावाजवळची घटना..

प्रा.भाविक करमनकर..

तालुका प्रतिनिधी धानोरा..

       दुचाकीने पुलास धडक दिल्याने तीन तरुण जखमी झाल्याची घटना धानोरा-मुरूमगाव मार्गावरील टवेटोला गावाजवळ सायंकाळी सात वाजता घडली.

        लंकेश भजबुजे 25 वर्ष,कार्तिक कोडाप 26 वर्ष राहणार कळमटोला,क्रिश विलास हलामी 22 राहणार पन्नेमारा,तालुका धानोरा असे जखमींचे नावे आहेत.

        ते तीघेही मित्र असून पन्नेमारा येथे मित्राच्या गावी नाटक पाहण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या लाईट मुळे त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाकी पुलाच्या कठळ्याला जाऊन आदळली.

        यामुळे तिघेही मित्र जखमी झाले.त्यांना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले व पुढील उपचार करिता गडचिरोली येथे पाठविण्यात आले.