बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयास समोर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी विमान अपघाती निधन झाले. बारामती परिसरात त्यांच्या विमान अपघातात निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद परिस्थितीत पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी दुःख व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण गावातील बाजारपेठ व दुकाने बंद करून बंद पाळण्यात आला.
संचालक श्रीकांत बोडके, प्रदीप बोडके सर, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, मा. चेअरमन सुनील बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, ह भ प बाळासाहेब घाडगे, संजय दत्तू बोडके, ह भ प महेश सुतार, आधी सर्व ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांचा मंत्रिमंडळातील राजकीय प्रवासा बद्दल मनोगत व्यक्त केले.
अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला फुलांचा हार व पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्यासाठी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून केलेली मोठी सेवा.अडचणीच्या वेळी संकटातून धावून येणारा उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार या नावाचा कधीही विसर पडणार नाही. आपण पिंपरी बुद्रुक गावातील सर्वजण पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये आहोत हे दुःख आम्ही कार्यकर्ते म्हणून कधीही विसरू शकणार नाही.
संपूर्ण राज्यासाठी केलेली मोठी सेवा हीच अजित दादांची आठवण आणि ओळख आहे. परमेश्वराच्या नगरीमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी दोन मिनिट शांत उभे राहून पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमासाठी विद्यमान सरपंच, उपसरपंच,आजी-माजी सरपंच, साखर कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन व्हाईस चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पिंपरी बुद्रुक पंचक्रोशतील समस्त ग्रामस्थ आधी सर्वच उपस्थित होते.



