Home देशविदेश ईव्हीएम मशीन द्वारे,”मतांची चोरी,एक गंभीर,धोकादायक तथा विश्वासघातकी मुद्दा!…

ईव्हीएम मशीन द्वारे,”मतांची चोरी,एक गंभीर,धोकादायक तथा विश्वासघातकी मुद्दा!…

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

         लोकसभा,विधानसभा, महानगरपालिका,जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या सार्वजनिक निवडणूकातंर्गत ईव्हीएम मशीन द्वारे मतांची चोरी केली जाते हे सन २०१४ ला सर्वोच्च न्यायालयात शिध्द झाले आहे.सदर रिट याचिका भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती,त्यांच्या याचिकेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.

       सन २०१४,२०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा थोडा आधार घेतला तर ईव्हीएम मशीन द्वारे निष्पक्ष,भयमुक्त आणि स्वतंत्रपणे निवडणूका पार पाडल्या जाऊ शकत नाही असे दिसून आले आहे.

        अर्थात ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका धोखाधाडी करुन जिंकल्या जातात असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

     बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम,वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर,बसपा सुप्रीमो बहन मायावती यांनी ईव्हीएम मशीन द्वारा मत चोरी करून निकाल पाहिजे तसे फिरवले जातात असे पुराव्यानिशी पुढे आणले आहे.

        याचबरोबर बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी काँग्रेस आणि भाजपा ईव्हीएम मशीन द्वारे सत्ताधारी होत आहेत आणि बहुजन समाजातील पक्ष उमेदवारांना ईव्हीएम मशीन द्वारे पराभूत करुन त्या पक्षांना कमजोर करीत आहेत हे खुल्लम खुल्ला सांगितले आहे.याच ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीचे व वंचितचे उमेदवार पराभूत केले असावे असा विश्वासयुक्त संशय देशातील नागरिकांना आहे.

        बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम हे ईव्हीएम मशीन द्वारे मतांची चोरी करून भाजपा आणि काँग्रेस पक्ष निवडून येतात हे केवळ बोलण्यापुरते मर्यादित ठेवले नाही तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मशीन द्वारा मत चोरीची लढाई लढली व जिंकली सुध्दा.

         परत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मशीनच्या बाबतीत प्रकरण रजिस्टर केले असल्याची माहिती आहे.याचबरोबर त्यांनी अख्या भारत देशात अविरतपणे ईव्हीएम मशीनच्या विरोधात जनआंदोलन केले,अधिवेशन घेतले व हजारो कार्यक्रम केले आणि जनआंदोलनाद्वारे,अधिवेशनाद्वारे, कार्यक्रमाद्वारे त्यांनी भारत देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.

       “ईव्हीएम मशीन चोर है और निवडणूक आयोग चोरोंका सरदार है।,, हा त्यांचा नारा देशात खूपच प्रभावी व परिणामक ठरला हे विसरुन चालणार नाही.

      त्यांनी ईव्हीएम मशीनच्या बाबतीत दिलेला वरील नारा अतिशय संवेदनशील व मनाचा ठाव घेणारा होता.तद्वतच भारतीय राजकारणातील सदर नाराच बोलके वास्तव आहे हे भारतीय नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.

        उशीरा का होईना,ईव्हीएम मशीन द्वारा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मत चोरली जातात आणि मत चोरी द्वारे भाजपा केंद्रीय सत्ता व अनेक राज्याची राज्य सत्ता हस्तगत करीत आहे हे काँग्रेस पक्षाच्या लक्षात आले.विशेषतः लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या लक्षात पुराव्यानिशी आले.अर्थातच मत चोरी चव्हाट्यावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांना सहकार्य लाभले आहे व लाभत आहे.

           ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मत चोरीचे प्रकरण लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या लक्षात येताच त्यांनी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे व कार्यकर्त्यांद्वारे देशात,”ईव्हीएम मशीन विरोधात,जबरदस्त जनआंदोलन करणे सुरू केले आहे.

         देशाचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे जनआंदोलन ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका बंद होई पर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे.नव्हे तर सार्वत्रिक निवडणूकांमधून ईव्हीएम मशीन हटाव मोहिमेला महान क्रांतीची धार देणे गरजेचे झाले आहे.

          कारण लोकशाहीला पायदळी तुडवणारे आणि लोकशाहीचे दमन करणारे,अयोग्य विचारांचे राजकारणीच मतांची चोरी करु शकतात आणि देशाच्या सत्तेत आणि देशातंर्गत अनेक राज्याच्या सत्तेत,”मत चोरी द्वारे, वारंवार येऊ शकतात हे प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात सन २०१४ लाच शिध्द झाले आहे.

           वास्तविकता सन २०१४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईव्हीएम मशीन द्वारे सार्वत्रिक निवडणुका घेणे भारत देशात बंद व्हायला पाहिजे होते.पण देशातील बहुसंख्य बहुजन मुलनिवासी नागरिकांना मनुवादातंर्गत वर्णव्यवस्थेत व जातिव्यवस्थेत परत ढकलून त्यांना लाचार,अधिकारविहिन,परावलंबी,अंधश्रद्धाळू,बुध्दीहिन,वंचित,करायचे असल्याने या देशात ईव्हीएम मशीन द्वारे सार्वत्रिक निवडणुका घेणे सुरू आहे असेच आजच्या सत्ताधाऱ्यांच्या वर्तणुकीवरुन व त्यांच्या धोरणानुसार लक्षात येते आहे.

       मत चोरुन सत्ता मिळवणारे सत्ताधारी हे देशातील नागरिकांच्या बाबतीत बेईमान व गद्दार तर असतातच,पण असे सत्ताधारी सर्व क्षेत्रात दलालांची फौज उभी करतात.त्यांचे दलाल त्यांच्या सत्तेला सुरक्षित ठेवण्यासाठी पाहिजे तसे बेलगाम बोलतात व देशातील किंवा राज्यातील जनतेला सातत्याने भ्रमिष्ट करतात व एखाद्या मुद्याला अनुसरून नागरिकांना दिर्घकाळ गुरफटून ठेवतात हे आजपर्यंतच्या अनेक घटनाक्रमावरुन लक्षात आले आहे.

        भारत देशात ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लोकशाहीसाठी व देशातील नागरिकांसाठी मारक ठरु लागल्या आहेत.

       भाजपाची सत्ता हे देशाची तिजोरी वारंवार खाली करुन भांडवलदारांचे सर्वोतोपरी हित जपण्यासाठी आहे व त्यांच्या हाती देशातील सर्व मालमत्ता देण्यासाठी आहे हे वास्तव आहे.

        तद्वतच आर.एस.एस.चा आणि भाजपाचा गोपनीय एजंडा आहे की,या देशातील सर्व मालमत्ता विश्वासू असलेल्या फक्त दोनच भांडवलदारांच्या ताब्यात द्यावी व सर्व मालमत्ता दोनच भांडवलदारांच्या ताब्यात दिल्यानंतर या देशातील सर्व बहुजन नागरिकांना परत मनुच्या धार्मिक नियमानुसार गुलाम करावे.

     म्हणूनच या देशात हिंदू या शब्दाला अनुसरून धार्मिक वातावरण नेहमी गरम ठेवण्यात येत आहे असे दिसून येते.

        हिंदू हा शब्द पारशियन असल्याचे अनेक तत्ववेत्ता यांनी सांगितले आहे., या शब्दाचा उपयोग इ.स.१६ व्या शतकात मोघल राजवटीत करणे सुरू झाले होते.हिंदू या शब्दाचा अर्थ गलिच्छ शिव्यातंर्गत असल्याने या देशातील नागरिकांना दररोज हिंदू म्हणून शिव्या दिल्या जातात काय?यावर देशभरात चर्चा होणे आवश्यक आहे.

       विशेषत: बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व राष्ट्रीय महासचिव प्रा.विलास खरात यांनी अनेकदा हिंदू या शब्दावर इतिहासिक दाखले देत खुलासे केले आहेत.

        याचबरोब सन १९९५ ला सर्वोच्च न्यायालयाने हिंदू नावाचा धर्म नसल्याचे म्हटले आहे.आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा हिंदू धर्म नसल्याचे महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे एका कार्यक्रमात म्हटले आहे.

        एकतर हिंदू शब्द पारशियन आहे,म्हणजे भारतीय नाही.दुसरे असे की,हिंदू शब्द मोघलांनी म्हणजेच मुस्लिम राजवटीत पारतंत्र्याच्या काळात सन १६ व्या शतकात मुलनिवासी बहुजन भारतीयांना हिनवन्यासाठी उपयोगात आणल्या गेलेला आहे असे जगप्रसिद्ध तत्ववेत्ता तथा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व राष्ट्रीय महासचिव प्रा.विलास खरात यांचे म्हणणे आहे.याचबरोबर हिंदू हा शब्द भारतीय नसल्याचे जगप्रसिद्ध तत्ववेत्ता वामन मेश्राम जगजाहीर म्हटले आहे व ते वारंवार इतिहासिक पुरावे देऊन सांगत आहेत.

       असे असताना हिंदू धर्म आहे हे भारतीय नागरिकांना वारंवार सांगणे म्हणजे त्यांच्यासोबत विश्वासघात व धोखाधाडी करणे नव्हे काय?यावर देशातील नागरिकांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

        हिंदू शब्दाला अनुसरून शिवी होत असेल तर भारत देशातील नागरिकांना दररोज हिंदू म्हणून का म्हणून शिव्या दिल्या जातात हेच कळायला मार्ग नाही.

       मात्र हिंदू या शब्दात ईव्हीएम मशीन द्वारे मतांची चोरी रोखणारी ताकद आहे.हे ताकद धर्मात परिवर्तन करुन क्षिन्न करण्यात आली असल्याचे नाकारता येत नाही.

       आम्ही हिंदू धर्मीय आहोत असे म्हटले की ईव्हीएम मशीन द्वारे मतांच्या होणाऱ्या चोरींकडून देशातील नागरिकांचे लक्ष हटविता येते,असेही राजकीय व धार्मिक सुत्र असू शकते.किंवा हिंदू या शब्दाला अनुसरून गोपनीय छडयंत्राचा गंभीर धोकादायक भागही असू शकते..

        मात्र,ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका भारत देशातील नागरिकांच्या मानगुटीवर वार करीत असल्याने त्यांचे मुलभूत अधिकार खाजगीकरणाच्या माध्यमातून जोमाने नाहिसे केले जात आहे.

         भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना मिळालेले सर्व प्रकारचे अधिकार त्यांच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला कायदेशीर मोकळीकता देणारे आहेत,त्यांचा सर्वांगीण विकास करणारे आहेत,त्यांच्या अभिव्यक्ती मताला संरक्षण देणारे आहेत.त्यांना शासनप्रशानात प्रतिनिधीत्व देणारे आहेत.(उदा:- खासदार/आमदार/इतर लोकप्रतिनिधी/अधिकारी/ कर्मचारी.)

     म्हणूनच ईव्हीएम मशीन द्वारे मत चोरीचे प्रकरण अतिशय गंभीर,धोकादायक,विश्वासघातकी आणि चिंताजनक आहे.