डॉ. अनुराग रुडे ‘महाराष्ट्र “रत्न” पुरस्काराने सन्मानित…. — अनेक संघटनांनी घेतली उत्कृष्ट कार्यांची दखल….

 

प्रितम देवाजी जनबंधु

संपादक 

         अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले डॉ. अनुराग अनिल रुडे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना , पोलीस मित्र माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण सेवा, ऑल इंडिया एंन्टी करप्शन कमिटी, भारतीय महाक्रांती सेना, क्राईम प्रिव्हेन्शन ऍन्टी करप्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय, महत्वपूर्ण कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

           अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमात डॉ. अनुराग अनिल रुडे यांना “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्यातील चाहत्या मित्रमंडळी, अधिकारी पदाधिकारी तसेच सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक अभिनंदन करुन पुढील सर्व प्रगतीच्या, विकास कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.