उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
जून्नरचे आमदार शरद सोनवने यांनी अधिकारी व काही कार्यकर्त्यांसमक्ष महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या बाबतीत अगदी खालच्या स्तरावरुन अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे आज सोमवारला दुपारी आदिवासी बांधवांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आमदार सोनवणे यांचा जाहीर निषेध केला.
आमदार सोनवणे यांची आमदारकी रद्द करुन आणि त्यांच्या बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली.
निवेदन सादर करताना अधिवक्ता अशोक तुमराम, अशोक उईके, पुरुषोत्तम सोयाम,जितेश कुळमेथे,गोकुल मेश्राम, अशोक मेश्राम,डाॅ.देव कन्नाके, रमेश मेश्राम,भोला मडावी, हितेश मडावी, मधुकर कोडापे, युवराज मेश्राम, वारलु मेश्राम ,वामन गणवीर, कैलास मडावी, भैय्या उईके,रंजना किन्नाके ,वैशाली मेश्राम,पोर्णीमा तोडकर अनिता राजगडकर व अश्विनी मेश्राम उपस्थित होते.



