शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुकांर्गत महादवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाातंर्गत राज्य महामार्गाला जोडण्याकरिता तीन वर्षांपूर्वी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.रस्त्याच्या कडेला अत्यल्प मुरुम टाकण्यात आला.
२५१५ अंतर्गत मंजूर सभागृहाचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असल्याचा आरोप सरपंच भोजराज कामडी यांनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की,ग्रामपंचायत क्षेत्रात हरणी मार्गावर झालेल्या कामात हयगय करीत कमी दर्जाचा मुरूम वापरण्यात आला.
या मार्गाची दर्जा तपासणी विभागाने सुद्धा उत्तम कामाची पावती देणे म्हणजे निकृष्ठ कामावर पांघरूण घालणे होय.
सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराच्या फायद्याकरिता ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार काम न करता मनमर्जीने रस्त्याची रुंदी वाढवून काम करण्यात आले.ठरावात नसलेल काम सुद्धा केल्याचा आरोप भोजराज कामडी यांनी केला.
सभागृहाचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले.हे काम अल्पावधीतच उखडलेला रस्त्याचे बांधकाम चिमूर येथील मजूर संस्थेला दिले होते.मात्र यात कोणतेही मजूर हे सोसायटीचे अधिकृत मजूर नव्हते.याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे करण्यात आली.त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.

गावातील सिमेंट रस्त्याचे बांधकाम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले.मात्र यात मजुरांना काम न करताही त्यांच्या खात्यात मजुरीची रक्कम टाकण्यात आली.या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
दवाखान्यात उपचाराकरिता भरती असलेल्या रुग्णालाही मजुरी देण्याचा पराक्रम करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत झालेली व सुरू असलेली कामे निकृष्ठ दर्जाची आहेत त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी विभागीय अभियंता मागील दशकापासून येथे कार्यरत आहे.त्यांची तातडीने बदली करून चौकशी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.



