Home देशविदेश धर्माचरण आणि कर्मकांड… 

धर्माचरण आणि कर्मकांड… 

       कर्मकांड म्हणजेच धर्माचरण असे देवभक्तना किंवा धर्मांध लोकांना वाटत असते.ती त्यांची चूक नाही,तर भजन कीर्तन प्रवचन संत महाराज बुवा बापू माता दादा यांचे द्वारे सतत प्रचार केल्या जातो,यास ” hamaring method ” म्हणतात.म्हणजेच खरी असो की खोटी गोष्ट सतत सतत सांगीत राहिली की ती खरीच वाटायला लागते.असाच हा प्रकार आहे.

        या विषयाचे चिंतन करण्यासाठी पुढील तीन प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरे शोधावी लागतील,म्हणजे हा विषय समजायला सोपे होईल.

1.धर्माचे आचरण कोणते ?
2.कर्मकांड म्हणजे काय ? आणि कोणते ?
3.कर्मकांड केल्याने पुण्य मिळते की नाही ? 
4.कर्मकांड म्हणजे देवाची पूजा नव्हे का ?

     वरील प्रश्नांची उत्तरे पुढील विश्लेषणातून मिळतील.

    धर्म म्हणजे धारणा. धारणा म्हणजे विश्वास.विश्वास म्हणजे मनाने किंवा मान्यता.

   धर्माची व्याख्या अशी, 

दया क्षमा शांती हे तीन तत्व धर्माचा पाया आहे,यावरच धर्माची इमारत किंवा संकल्पना उभी आहे. ” अहिंसा परमो धर्मा: ” असे जैन धर्म आणि बौद्ध धर्म पण म्हणतो.” सार्वजनिक सत्यधर्म ” म्हणजेच सत्य हे सार्वजनिक झाले पाहिजे,तोच धर्म होय,असे ज्योतिबा फुले म्हणाले,ज्या धर्मात स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय नाही तो धर्म मी मानणार नाही,असे बाबासाहेब म्हणाले. खरातो एकाची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे,असे साने गुरुजी म्हणाले.दया आणि प्रेम म्हणजेच मानवाचा धर्म होय,असे येशूनि सांगितले.सत्य म्हणजेच धर्म,असे गुरुनानक म्हणाले.समता त्याग म्हणजे धर्म ,असे पैगंबरांनी सांगितले.याचा अर्थ ” सत्य न्याय निती,दया क्षमा शांती,प्रेम बंधुभाव, त्याग समता,स्वातंत्र्य न्याय ” ही उच्च मानवी मूल्य म्हणजेच धर्म. धर्माचा अर्थ होतो.

     वरील महामानवानी सांगितलेले उच्च मूल्य यांचे आचरण करणे,जीवन जगताना त्यांचा वापर करणे,पालन करणे,ती मानणे,या मूल्यांना मान्यता देणे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणे,ही उच्च मूल्य व्यवहारात आणणे म्हणजेच धर्माचे आचरण किंवा पालन होय.अशा प्रकारचे आचरण कुणीही करताना दिसत नाही,याचा अर्थ कुणीही धर्म पालन करीत नाहीत.तरीही धर्माचा अभिमान अस्मिता मात्र डोक्यात खच्चून भरलेली आहे,एव्हडी की,धर्मासाठी जीव देण्याची पण तयारी आहे.नव्हे अनेक जीव जाताहेत.ही वस्तुस्थिती आहे.कर्मकांड म्हणजेच धर्म,अशी चुकीची आणि खोटी व्याख्या धर्माची झालेली आहे.

    कर्मकांड म्हणजे ” देव आहे,तो निर्गुण निराकार असल्यामुळे तो दिसत नाही ,आणि जाणवत नाही की अनुभवास येत नाही,म्हणून त्याचे सगुण साकार रूप मानायचे,मानायचे.म्हणजे केवळ कल्पना करायची,स्वप्न बघायचे,आणि त्यानुसार निराकार देवास साकार रूप द्यायचे,म्हणजेच त्याची मूर्ती बनवायची,ती मूर्ती चोरीला जाऊ नये,किंवा अस्पृश्य लोकांनी. स्पृश्य करू नये,म्हणून त्या दगडाच्या कींव धातूच्या निर्जीव मूर्ती सभोवती देऊळ बांधून त्याला कडी कुलूप घालायचे,तिथे एक पुरोहित म्हणजे पुजारी म्हणजे संरक्षक नेमायचा आणि त्याच्याकडेच त्या देवळाची चाबी ठेवायची,तो पुजारी मात्र इतर कोणत्याही जातीचा नव्हे तर केवळ ब्राम्हण किंवा जंगमच असला पाहिजे,हा नियम ,का ? तर मनुस्मृतीनुसार देवाच्या जवळ जाण्याचा आणि त्याची पूजा अर्चना ,करण्याचा अधिकार आणि हक्क फक्त जात व्यवस्थेतील पुरोहितासच आहे म्हणून.

      देव धर्म माणूस या तिघांचं नातं या विषमतावादी व्यवस्थेने अगदी घट्ट केलं आहे,देवासाठी धर्म आणि धर्मासाठी माणूस.असे या व्यवस्थेचे तत्वद्न्यान आहे.धर्म आहे म्हणून माणूस आहे आणि धर्म आहे म्हणून देव आहे.याचा अर्थ धर्म नसता तर देव.आणि माणूस नसते.

    माणसाला देवाची का गरज वाटली ? याचे कारण म्हणजे माणूस हा प्रथम प्राणी आहे,त्याची पहिली गरज म्हणजे शारीरिक आणि मानसिक भूक आहे,त्यासाठी तो आधी कसलाच आणि कुणाचाच विचार न करता केवळ आपला स्वार्थासाठी स्वार्थ लोभ अन्याय अत्याचार करू लागतो, जंगली प्राण्यासारखे वर्तन करतो,अशा जंगली माणसाला कुणाची तरी भीती असावी म्हणून ” ईश्वर ” ही संकल्पना माणसांनी निर्माण करून,देव हा इथे पृथ्वीवर नसतो तर तो वर आकाशात स्वर्गात.वैकुंठात असतो,आणि कोण किती पुण्य आणि पाप करतो,हे तो त्याच्या हजार डोळ्यांनी पाहत असतो.आपण कितीही लपून छापून वाईट गोष्टी केल्या,म्हणजे भ्रष्टाचार बलात्कार अन्याय अत्याचार शोषण दुराचार सदाचार हे सारे तो पाहतो,त्याची नोंद ठेऊन ,मेल्या नंतर वर त्यास त्याच्या चुकीनुसार दंड देतो”. अशी देवाची भीती ही दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जन लोकांसाठी घातली आहे.पण असे घडतांना दिसत नाही.दुराचारी लोकांचे अन्यायी वागणे काही बंद झालेले नाही.याचे कारण ,लहानपणी बागुलबुवा वाटतो तो मोठेपणी नाहीसा होतो.

      देवाची मूर्ती,देऊळ,त्याची नित्य पूजा आरती भजन पूजन, व्रत वैकल्य,नवस सायास,आनंदान म्हणून भंडारे करणे,तीर्थयात्रा करणे,देवाला पैसे सोने चांदी देणे ,जप तप अनुष्ठान,देवापुढे बकऱ्याचा बळी देणे,कंदोरी करणे, कौल लावणे,हळद कुंकू भंडारा गुलाल शेंदूर साखर नारळ फुले अर्पण करणे,देवाला पुत्र प्राप्ती धन प्राप्ती चे नवस करणे हे सारे कर्मकांड आणि अंधश्रद्धाच आहेत.असे कर्मकांड करणे म्हणजे धर्मकार्य किंवा पुण्य कार्य नव्हे,कारण देव असेलच तर तो सगुण साकार नाही,तर कदाचित निर्गुण निराकार असेल तर त्यास भूक लागत नाही,किंवा झोप पण येत नाही,तोच जर जगाचा मालक किंवा निर्माता असेल तर त्यास काय कमी पडले म्हणून भक्तांनी त्यास द्यावे ? उलट हे चराचर जे त्याने निर्माण केले, हे त्याच्या साठी नसून माणसासाठीच निर्माण केले आहे.हे अन्न,वृक्ष,फुले,फळे,प्राणी,पक्षी,वनस्पती,माणसे हे सारे जगत त्याचीच निर्मिती.सारी माणसे त्याचीच मुले , असे असेल तर मग त्याचे घेऊन त्यालाच देणे योग्य नव्हे,चुकीचे पण आहे.खरे तर देव म्हणजे देणारा असतो.घेणारे आपण असतो.असे हे देवाचे आणि माणसाचे नाते एकदा समजले की,मग माणूस भक्त सारेच कर्मकांड सोडून देईल.नव्हे सोडलेच पाहिजे.याचे अजून एक कारण म्हणजे यामुळे माणसाचा पैसा धन वाया जाते.अमूल्य असे श्रम आणि वेळ पण हे कर्मकांड केल्यामुळे वाया जातो.शिवाय या कर्मकांडातून पुण्य तर मिळतच नाही,पण भिकारी भिकच माहीत राहतात,काम करणारच नाहीत,भिकारी का भीक मागतात ? याचे कारण भीक देणारे देतात म्हणून भिकारी भीक मागतात.याचा अर्थी माणसानं श्रमिक कष्ट करायला न लावता भिकारी बनविणे पाप आहे.भीक देणारा तो पापी,आणि भिकागणारा पण पापच होय.अगदी असेच पुजारी पुरोहितांचे आहे,हे ऐतखाऊ बांडगुळ,दुसऱ्यांच्या श्रमावर सेवेवर जगणारे,यांना ऐतखाऊ बनविण्याचे पाप कुणी केले ? तर देवाच्या भक्तांनीच. स्वतः कष्ट करायचे,मेहनत करायची आणि आयतेच या पुजारी पुरोहितांचे घर भरायचे ,हे पण दोघांचे पण पापच आहे.थोडक्यात काय तर ,कर्मकांड करणे म्हणजे पाप करणे आणि अंधश्रद्धा बाळगीने होय.

     ज्यांना कुणाला देव मानायचा आहे ,त्यांनी जरूर मानावा,पण निर्गुण निराकार मानवा.साकारस्वरूप मानून त्याच्या मुर्त्या , देवळे,त्याची पूजा,जप तप अनुष्ठान ,महापूजा,अभिषेक ,तीर्थाटन, नवस असे कर्मकांड करून आपला अमूल्य वेळ पैसा धन श्रम वाया घालवू नये.देवाला काहीच लागत नाही.फक्त दोन हस्तक आणि एक मस्तक आणि नाम या दोनच गोष्टी हव्या आहेत.हीच खरी भक्ती होय.

      धर्माचे मूलतत्व आणि मानवी कल्याणासाठी लागणाऱ्या गोष्टी प्रेम न्याय दया क्षमा शांती,त्याग ,समता यांचे पालन म्हणजेच धर्माचे आचरण होय.

      लेखक : दत्ता तुमवाड…

        सत्यशोधक समाज नांदेड…

दिनांक : 28 जून 2025.फोन: 9420912209.