मा.सा.कन्नमवार यांच्या भुमीतूनच वेगळा विदर्भाच्या आंदोलनाला सुरवात करणार.:- विदर्भ विचार मंच…  — माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांची उपस्थिती. 

ऋषी सहारे

संपादक

       गडचिरोली _ वेगळ्या विदर्भाच्या मगणीसाठी आता आंदोलनाची सुरवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.मा.सा.कन्नमवार याच्या पावण भुमीतुन वेगळ्या विदर्भाची सुरवात करून वेगळा विदर्भ मिळविल्या शिवाय स्वस्त बसणार नाही.

       कारण वेगळ्या विदर्भाचे खरे नेते पुढाकार घेणारे व वेगळा विदर्भासाठी आवाज उठविणारे पहिले नेते मा.सा.कन्नमवारच होत. 

      परंतु ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनल्यामुळे ते महाराष्ट्रातच रमले.त्यांचे विचार पुढे नेवून वेगळा विदर्भाचा लढा त्यांच्या भुमीतून सुरवात करण्याचे सुतोवाच खोरीपाचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांनी शर्कीट हाऊस गडचिरोली येथील एक महत्त्वाचा बैठकीत केले.

        वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी,विदर्भ विचार मंच नागपूरची महत्त्वपूर्ण बैठक रेस्ट हाऊस गडचिरोली येथे पार पडली. 

         सदर बैठकीला डॉ. शिरिष बाबटी वाले नागपूर,विदर्भवादी नेते सुनिल चोरवारे नागपूर,लक्ष्मण शंभरकर नागपूर , डॉ. डोंगरवार नागपूर आदि महत्वाचे नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली. 

     रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , अँड. विनय बांबोळे , प्रा. अशोक लांजेवार , बम्हपुरी खोरीपाचे नेते जिवन बागडे , मुरलीधर भानारकर ‘ मारोती भैसारे , दिलीप गोवर्धन , शरद लोणारे सहीत बहुसंख्य विदर्भवादी उपस्थित होते.

         जल ‘ जंगल ‘ जमीन हि मुलनिवासीची असुन विदर्भात लोह खनीज , जंगल. अशी विफुलसंपत्ती असुन वेगळा विदर्भ झाला तर विदर्भाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.

       यासाठी वेगळा विदर्भाचा लढा कन्नमवार भुमीतुनच सुरवात करून वेगळा विदर्भ मिळवू असे विचारअँड. विनय बांबोळे यांनी व्यक्त केले.

         यापुढे एक भव्य कार्यक्रम घेण्याचे डॉ .बाबरीवाले यांनी सांगीतले.सभेचे संचालन प्रा.अशोक लांजेवार यांनी केले तर आभार प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी मानले.