Home Social सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक झालेल्या बाम्हणगाव येथील कुटुंबियांना डॉ.सतिष वारजूकरांची साथ...

सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक झालेल्या बाम्हणगाव येथील कुटुंबियांना डॉ.सतिष वारजूकरांची साथ व दिला मदतीचा हात…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

    चहा तयार करीत असताना सिलिंडरचा स्फोट होऊन अख्खे घर जळाले होते.वेळीच आई मुलगा व सुन बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. यामध्ये 70 हजारांच्या रोख रक्कमेसह, सोन्याचा गोप व अंगठी जळाली आहे. ही घटना सोमवारी (दि.24) दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथे घडली.

        आगीमध्ये मंजुळाबाई धर्माजी मेश्राम यांचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.

            प्राप्त माहितीनुसार,ताडोबा अंधारी प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या चिमूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील मंजुळाबाई धर्माजी मेश्राम ह्या रहिवासी आहेत. 

      मंगळवारी दुपारी त्यांनी मुलगा,सुन व स्वःतासाठी गॅसवर चहा मांडला होता.गॅस सुरू करताच थेट गॅसपासून पाईप जळायला लागला.त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि मंजुळाबाई मुलगा विलास व सुनेसह घरातून बाहेर पडली.

        काही क्षणातच पाईपची आग गॅस हंड्यापर्यंत पोहोचून सिलिंडरचा स्फोट झाला.यामध्ये आग लागून घराने पेट घेतला.

       सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ.सतिष वारजुकर यांनी बाम्हणगाव येथे जाऊन जळालेल्या घराची पाहणी केली व आर्थिक मदत दिली.

     या वेळी चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे,काँग्रेस कार्यकर्ते संजूभाऊ पाटील,सोनूभाऊ निकुरे उपस्थित होते.