एन. जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रितम जनबंधु यांची नियुक्ती….

 

     अश्विन बोदेले

जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली 

               एन. जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पांडूरंग नरवडे यांनी नुकतेच विदर्भ प्रदेश कार्यकारिणीला मान्यता दिली असून विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी दखल न्यूज भारत चे संपादक प्रितम जनबंधु यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

           गडचिरोली जिल्हा अंतर्गत आरमोरी तालुक्यातील नरचुली सारख्या दुर्गम भागातील रहिवासी असलेले प्रितम जनबंधु हे समाजसेवेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य करतात. तद्वतच ते पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व तद्वतच अभूतपूर्व लिखाणाच्या जोरावर आपला प्रभाव कायम ठेवत जनमानसात आपली आगळीवेगळी छबी निर्माण केली आहे.

            प्रितम जनबंधू सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत, अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपने मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे, आपल्या सहकारी मीत्रा विषयी संपादक प्रीतम जनबंधू सर यांच्या वैचारिक मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील, पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं, ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले संपादक…! काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजेच प्रितम जनबंधू सर…..!

        आपल्या निस्वार्थ कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करणारे, पत्रकारितेतील दांडगा अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तद्वतच शांतीप्रिय कृतीशील मनोधर्याचे धनी तद्वतच एक पत्रकार ते संपादक असा पत्रकारितेतील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारतचे संपादक आ. प्रीतम जनबंधू हे सदैव संवेदनशील व्यक्तिमत्त्व असून बोलते वैचारिक पिठ आहेत. त्याचा स्वभाव शांत असून असून ते समजदार आहेत. तद्वतच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याची एन जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ते सार्थकी ठरवतील असे म्हणण्यास हरकत नाही..