एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पदी संजय टेंभुर्णे यांची नियुक्ती.. — संवेदनशील व्यक्तिमत्त्व कार्यकारिणीवर..

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

      एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे यांनी नुकतेच विदर्भ प्रदेश कार्यकारिणीला मान्यता दिली असून विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी संजय टेंभुर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

           भंडारा जिल्हा अंतर्गत साकोली तालुक्यातील रहिवासी असलेले संजय टेंभुर्णे हे समाजसेवेसह नाट्य मंडळाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य करतात.तद्वतच ते पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असतात.

        ते सदैव संवेदनशील व्यक्तिमत्त्व असून बोलते वैचारिकपिठ आहेत.त्याचा स्वभाव शांत असून असून ते समजदार आहेत.तद्वतच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

           त्याची एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ते सार्थकी ठरवतील असे म्हणण्यास हरकत नाही..