उपक्षम रामटेके
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी दिनांक. २४ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी वहानगाव येथे त्यांनी भेट दिली.
पाहणी करून पुढे जाताना शेतकऱ्यांनी पालक मंत्री तथा आमदारांना सातबारा कोरा करा – कोरा करा म्हणून ओरड सुरु केली परंतु त्यांची ओरड सुरू असतानाच पालकमंत्री गाडीत बसले. मात्र बाहेर असलेले भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे शेतकऱ्यांवर संतापले.
जे संकट आले आहे, त्याची आधी तर चिंता करा, असे त्यांनी खडेबोल शेतकऱ्यांना सुनावले आणि गाडीत बसले. शेतकऱ्यांचा रोष यावेळी उफाळून आला नसला तरी त्यांनी त्यांच्या मनातील भावना मात्र व्यक्त केल्या.
विधानसभा निवडणुकीत जो जाहीरनामा जनतेसामोर ठेवण्यात आला होता तो पूर्ण न केल्याने सर्वत्र यावर भाष्य केले जात आहे यात चिडण्याचे आणि शेतकऱ्यांवर रोष व्यक्त करायचे कारण काय? सत्यता उघड करणे गुन्हा नाही तर तो अधिकार आहे.



