शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
निसर्गाच्या हिरवळ कुशीत असलेल्या विदर्भातील प्रसिद्ध मुग्दाई धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटकांची अफाट गर्दी उसळत असते.दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा पर्यटकांची वर्दळ मुग्दाई धबधब्यावर दिसत आहे.
५५ फूट उंचीवरून कोसळणाऱ्या धबधबा पर्यटकांला आकर्षण ठरते.पण याच मुग्दाई धबधब्याचा पुरातन इतिहास आहे.याकडे मात्र येणाऱ्या तरुणाईचा व पर्यटकांचा विसर पडताना दिसत आहे.
तर मुग्दाईचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला शके १०३५ ला म्हणजे ई.स.१११५ ला कनकाबाई दडमल याच्या पोठी झाला.वडील दागोजी दडमल असून,ते मदनागडचे वतनदार होते. मुग्दाई लहानपणापासून धाडसी असल्याने नागानंद साधू यांचे प्रभाव मुग्दाईच्या जीवनावर पडले.
नंतर वडिलांचे कार्य समोर चालवण्यासाठी व स्वतः आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी बाराव्या शतकात ११४० ते ११५० या कालखंडात द्रविड वंशीय गोंड राजे यांच्या सोबत सत्ता संघर्ष सुरू झाला.
माना जमातीचे रक्षण करण्यासाठी प्रखर झुंज देत शत्रूंना पराजीत करून बाळाला स्तनपान करण्याकरिता बसले असता,एका छुप्या शत्रूंनी वी.मुग्दाईचा वध केला.त्याच ठिकाणाला आज युद्धभूमी म्हणतात.

आजही त्या ठिकाणी दगडावर हत्ती,घोडे,व मनुष्याचे पाय उमटलेले प्रत्येक्षात दिसतात.माना समाज बांधव व इतर नागरीक युद्धभूमी वर गेल्यास आपल्या शक्ती नुसार दगड अर्पण करून श्रद्धा करतात.
मदनागडाचे (रीटगाव) वतनदार दागोजी दडमल यांना सात मूली होत्या.अंबाई,निंबाई,उमाई,गौराई, मुग्दाई,पवराई व भिवराई म्हणून पेरजागडच्या पर्वत रांगा यांना सात बहिणीचे डोंगर म्हणून ओळखले जात आहे.या सातही बहिणीची आजही वास्तविकता बघायला मिळत आहे.
ज्या मुग्दाईने आपल्या माना जमातिच्या मुक्तीसाठी शत्रुसोबत झुंज देत राहिली.अशा रणरागिणीची जयंती मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरी होत असते.
आदिवासी समाजातील माना जमात संघटित करण्यासाठी मुग्दाई जयंती उत्सव २००५ पासून नियमित होत आहे.पण पावसाळ्यात येणारा पर्यटक या इतीहासापासून कोसो दूरावर असतात.फक्त धबधब्याच्या पर्यटन दृष्टीने पर्यटक येत असतात.
धबधबा करतोय पर्यटकांना आकर्षित….
निसर्गाच्या रम्य कुशीत ५५ फुटांवरून कोसळणारा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करताना दिसते. निसर्गातील झाडे,दगड यांच्या सोबत भांडून धबधबा वाहत असते अनेक मुळे,झाड पाला पाचोळा एकत्रित करून वाहत असते,तर एक आयुर्वेदिक महत्व पर्यटक धबधब्याला देताना दिसत आहे.
निसर्गाची अनमोल दिलेली देणगी पाण्याची विहीर….
मुग्दाई मंदिराच्या पूर्वेस निसर्गाने किमया दाखवत नैसर्गिक विहिरीची उत्पती केली आहे.तडाख्याच्या उन्हाळ्यात सुद्धा पाणी भरून असलेली, विहिरीची लांबी १२ फूट आहे तर रुंदी २ फूट आहे व खोली चा अंदाज सांगता येत नाही. विहिरीचा गाळ चैत्र पौर्णिमेला दरवर्षी काढला जातो. पण एकाच व्यक्तीला जाण्याईतकी जागा असल्याने जास्त खोलवर कोणीच उतरू शकत नाही. पिकांवर कीड लागले तर अनेक शेतकरी याच नैसर्गिक विहिरीचं पाणी शेतात अमृतासारखे शिंपडतात.
वन व पोलीस विभागाचे लक्ष कमी….
गेल्या वर्षात पर्यटन स्थळापासून काही अंतरावर एका गुराख्याचा वाघाने बळी घेतला असल्याने पर्यटन स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता.पण आता या स्थळावर वन विभाग सुद्धा दूर्लक्ष करित आहे.वन्य प्राण्यापासून पर्यटकांना कोणताही धोका होणार यासाठी वन विभागाने उपाय योजना करायला पाहिजे. पर्यटन स्थळावर पर्यटकांकडून दारू पिऊन चिडीमारी, अश्लिल चाळे होत असतात.यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने शनिवार रविवारलाच बंदोबस्त न करता उर्वरित दिवस पण करायला पाहिजे.
बॉक्स…..
विदर्भात प्रामुख्याने नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली,वर्धा,यवतमाळ,भंडारा या जिल्हात व मध्यप्रदेश छतीसगढच्या सीमा लागत भागात माना जमात आढळते.
या सर्वांना एकत्रित करण्यासाठी आमचे मार्गदर्शक स्व.महादेव जांभूळे यांनी आंबेडकरी समाजाचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.त्याच परंपरेला स्विकारून २००५ सालापासून आम्ही नागदिवाळी उत्सव साजरा करीत आहे. व समाज बांधवा कडून उत्तम प्रतीसाद मिळत आहे.



