Home Maharashtra नालीच्या खड्ड्यामुळे जीवितास धोका,ग्रामपंचायतसह चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केले हात...

नालीच्या खड्ड्यामुळे जीवितास धोका,ग्रामपंचायतसह चिमूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केले हात वर…

शुभम गजभिये.. 

विशेष प्रतिनिधी…

        शंकरपूर येथून जवळच असलेल्या जवराबोडी येथील अर्धवट नाली बांधकामामुळे व खोदलेल्या खड्ड्यामुळे घराजवळील लोकांना व पादचाऱ्यांनच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग व सरपंच यांच्याकडे आशिष महाले यांनी केलेली आहे.

      जवराबोडी साठगाव रस्त्याच्या बाजूने नालीचे बांधकाम करण्यात आले.हे नालीचे बांधकाम आशिष महाले यांच्या राहत्या घरापर्यंत करण्यात आले आहे आणि तिथून हे बांधकाम बंद करण्यात आले आहे.

      सोबतच या नालीसाठी जवळपास सहा ते सात फूट खड्डा खोदल्या गेलेला आहे.त्याच्यामुळे तिथेच पाणी जमा राहते,यासोबतच त्यांचे राहते घर असल्यामुळे जीवितास धोका होऊ शकतो.

     तसेच पाणी साचून राहत असल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे त्यांनी सरपंच यांच्याकडे तक्रार दाखल केली.

      परंतु सरपंचानी हे काम आमचे नाही असे बोलून तक्रारीला केराची टोपली दाखवलेली आहे.त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची तक्रार केलेली आहे.

      परंतु त्यांनी हात वरती केले आहे.सदर नाली बांधकाम पूर्ण करण्यात येत होते श.परंतु सरपंचाने राहिलेल्या नाली बांधकाम दुसरीकडे वळविल्यामुळे ते बांधकाम जसेच्या तसेच आहे,असा आरोप महाले यांनी केला आहे.

       नाली चे बांधकाम पूर्ण करण्यात यावे व खड्डा बुजविण्यात यावा अशी मागणी त्यांनी सरपंच यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सरपंचाकडून हमीपत्र लिहून घेतले आहे.सदर हमी पत्रामध्ये सरपंच यांनी ग्रामपंचायत च्या लेटर पॅड वर जाहीर रित्या लिहून दिलेला आहे की नाली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी साचून राहिल्यास व त्यात जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी मी व माझे ग्रामपंचायत सदस्य जबाबदार राहतील.

      त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वरती केले आहे.