Home Maharashtra आळंदीत ज्ञानभुमीत जागतिक दर्जाचे तत्वज्ञान विद्यापीठ उभारु :– विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा..

आळंदीत ज्ञानभुमीत जागतिक दर्जाचे तत्वज्ञान विद्यापीठ उभारु :– विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा..

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वरांनी समाजात सामाजिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित केले. संत ज्ञानेश्वरांचे विचार आजही काळाची गरज आहेत. त्यांच्या ज्ञानेश्वरी, अभंग आणि विचारांनी समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत आणि आजही ते लोकांना प्रेरणा देत आहेत.

        त्यांच्या विचारांनी समाजात समानता आणि न्यायाचे महत्त्व वाढवले. त्यांचे विचार जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी विश्‍वस्त पदाच्या सात वर्षांच्या कालावधीत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे उभारायचे आहे,” असा मानस आळंदी देवस्थानचे नवनिर्वाचित विश्‍वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी व्यक्त केला. 

       आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा सत्कार समारंभ माऊली मदीरात संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे बोलत होते.

       यावेळी विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, राहुल चिताळकर, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक डि.डि.भोसले, श्रीधर कुऱ्हाडे, रमेश गोगावले, भाजप नेते संजय घुंडरे, राम गावडे, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, शंकरराव कुऱ्हाडे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, चेअरमन पांडुरंग वरखडे, नंदकुमार वडगावकर, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, महेश कुऱ्हाडे, निसार सय्यद, संदीप नाईकरे, प्रसाद बोराटे, सतीष कुऱ्हाडे, संकेत वाघमारे, रविंद्र रणदिवे तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

       डॉ.भावार्थ देखणे म्हणाले, ”आळंदी देवस्थानच्या विश्‍वस्तपदी प्रथम महिला भगिनी आदिशक्ती मुक्ताई रूपाने निवड झाल्याने आम्ही भावंडे कधी चुकलो तर मुक्ताई होऊन त्या मार्ग दाखवतील.”नवनिर्वाचित महिला विश्‍वस्त ॲड.रोहिणी पवार म्हणाल्या, ”मुक्ताईची उपमा दिल्याने माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. जास्तीत जास्त वेळ देवस्थानच्या सेवा कार्यासाठी असेल. महिला भाविकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन.”