प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या व राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,रानी अहिल्याबाई होळकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने दिनांक २४ आक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला झालेल्या महामोर्चा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान स्विकारण्यास व मानन्यास नकार दिला,राष्ट्रीय ध्वज तिरंगा घेण्यास अमान्य केले आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिलाय,यामुळे ही संघटना भारत देश विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तद्वतच ही बेकायदेशीर असलेली संघटना भारत देशातील नागरिकांच्या हक्कांसाठी व संरक्षणासाठी अजिबात संघर्ष करीत नसल्याने या संघटनेचे ध्येय व धोरणे ही भारत देशविरोधी व भारतीय नागरिकांच्या विरोधात असल्याचे पुढे आले आहे…
दिनांक २४/१०/२०२५,रोज शुक्रवारला झालेल्या औरंगाबाद येथील महा जन आक्रोश मोर्चा अंतर्गत वंचित बहुजन आघाडीला,” भारतीय संविधान,आरएसएसला द्यायचे होते जे संविधानाचा आदर करत नाही..
वंचित बहुजन आघाडीला तिरंगा आरएसएसला द्यायचा होता,जे भारतीय तिरंग्याचा आदर करत नाही.
त्यांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची एक प्रत,” नोंदणीकृत नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायची होती जेणेकरून ते स्वतःची नोंदणी करू शकेल.
पण संघाने भारताचे संविधान,तिरंगा आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला.त्याऐवजी,औरंगाबाद डीसीपीने ते स्वीकारले!
औरंगाबाद डिसीपी यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी भारतीय तिरंगा सादर केला.अमित भुईगल यांनी भारतीय संविधान सादर केले.शमिभा पाटील यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था कायद्याची प्रत सादर केली.
भारत मुक्ती मोर्चा…..
यापुर्वी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच,भारत देशांतर्गत महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचे धाडस बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले.या त्यांच्या आर.एस.एस.मुख्यालय घेराव आंदोलनाने जगभरात त्यांच्या संघटनेची ताकद दिसून आली होती.
आरएसएस नेहमीच बामसेफच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवत आहे.त्यांचे कार्यक्रम असंवैधानिक पद्धतीने थांबवण्याचे प्रयत्न अनेक वेळा भाजपा सरकारच्या काळात करण्यात आले.
त्यामुळे ६ ऑक्टोबर २०२२ रोजी ५ लाख मुल निवासी बांधवांनी नागपूरला घेराव घातला होता.बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी,त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धत पाहून सगळेच थक्क झाले होते.हीच BAMCEF ची भारत देशात खरी ताकद आहे.
ब्राह्मण वाद हा,या देशातील बहुजन म्हणजे मुळ निवासी नागरिकांसाठी कसा घातक,शोषक,अन्यायकारक, अत्याचारकारक आहे आणि मानसिक गुलाम बनवून ठेवणारा आहे,याबाबत भारत मुक्ती मोर्चाचे तथा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आपल्या संघटने अंतर्गत कार्यक्रमाच्या माध्यमातून उदाहरणांसह पुराव्यानिशी सांगतात..
बसपा संस्थापक मान्यवर कांशीरामजी यांचा भारत देशांतर्गत बहुजन समाजातील नागरिकांना मौलिक सल्ला व इशारा….
बसपाचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांनी भारत देशात,”मनुवादी व ब्राह्मणवादी विचारसरणीची देशभर चिरफाड केली होती.
तद्वतच ब्राह्मणवादी आणि मनुवादी या देशातील बहुजन नागरिकांसाठी कसे विषारी नाग आहेत व ते पक्षाच्या आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बहुजन समाजातील नागरिकांचा कसा वारंवार द्वंश घेतात हे सुद्धा समजावून सांगितले होते.
म्हणूनच त्यांनी देशातील बहुजन समाजातील नागरिकांना राजकीय व सामाजिक सुत्र समजावून सांगताना म्हटले होते,
१)”वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा!..
२) जिसकी जितनी संख्याभारी,उतनी उसकी भागिदारी!….
३) हमारे वोट से बनेंगे हमारे पिएम-सिएम,हमारी सत्ता से होंगे हमारे बहुजन समाज के जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक और सब प्रकार के अधिकारी,कर्मचारी…
४) जातीवाद भगायेंगे, समतावाद लायेंगे…
अर्थात या देशातील बहुजन समाजातील नागरिक या देशाचे मालक-चालक बनावे यासाठी मान्यवर कांशीरामजी यांनी अविरत संघर्ष केला.
याचबरोबर या देशातील बहुजन समाजातंर्गत नागरिकांनी मनुवादी व ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांपासून,त्यांच्या पक्षापासून व सामाजिक संघटना पासून कोसो दूर राहिले पाहिजे असे मान्यवर कांशीरामजी यांनी सांगितले आहे.तुम्ही त्यांच्यापासून दूर झाले नाही तर तुमच्याच मताचा फायदा घेऊन ते तुम्हाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही अशा गंभीर इशाराही मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजातील नागरिकांना दिला होता.
राष्ट्रीय कांग्रेस पक्ष….
आता भारताचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी व त्यांचे पक्ष पदाधिकारी हे बऱ्याच प्रमाणात भाजपाच्या व आर.एस.एस.च्या भारतातील लोक विरोधी धोरणांना व त्यांच्या लोक विरोधी विचारांना उघडे पाडत आहेत.
पण,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी हे ब्राह्मण वादावर कधीच बोलत नाही,असे दिसून येते.
महत्त्वाचे…..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी वारंवार म्हणतात भारत देशात हिंदू बहुसंख्य आहेत.हो आहेत,पण त्यांच्या मानसन्मानासाठी,आदरांसाठी, हक्कांसाठी, शासन-प्रशानातील प्रतिनिधीत्वासाठी,त्यांच्या रोजगारासाठी,त्यांच्या शेतीमालांच्या योग्य भावासाठी, त्यांच्या पिक विम्यासाठी,त्यांच्या शासकीय नोकरीतील लोकसंख्येला अनुसरून भागिदारीसाठी,त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी,त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तुम्ही वास्तव कृती व कार्य काय करता? आणि सदर मुद्यांना अनुसरून कुठल्या पद्धतीचे नियोजन तुमच्याकडे आहे?हे या देशातील हिंदूंना आणि इतर धर्मीयांना सांगितले पाहिजे.
मात्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना प्रश्न आहे,”हिंदू हा धर्म नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.याचबरोबर संघ प्रमुख मोहन भागवत व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हिंदू धर्म नसल्याचे म्हटले आहे.
मग प्रश्न हा पडतो आहे की,भाजपा पक्षाचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे भारतीय नागरिकांना हिंदू हा धर्म आहे असे वारंवार सांगतात ते कशासाठी?….
हिंदू ही जिवन जगण्याची कार्यपद्धत आहे असे सर्वोच्च न्यायालयाने,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
प्रश्न…..
परंतु प्रश्न हा पडतो की,हिंदू हि जिवन जगण्याची सांस्कृतिक किंवा इतर प्रकारची कार्यपद्धत आहे तर….
१) ती कुठल्या तत्वावर आधारित आहे,२) तत्वांचा व तत्वातंर्गत कार्यपद्धतीचा कार्यभाग काय? ३) भाजपा व आर.एस.एस.व इतर हिंदू संघटनांची हींदू तत्वप्रणाली काय व कशावर आधारलेली आहे? ४) भारत देशातील हिंदू नागरिकांना ते समान दर्जाची वागणूक देतात काय? ५) भारत देशातील हिंदू नागरिकांच्या अधिकारांचे ते समान हक्क,समान न्याय,समान संधी या तत्व कार्यपध्दती नुसार संरक्षण करतात काय? ६) त्यांच्या हक्कांसाठी सार्वजनिकरित्या संघर्ष करतात काय? ७) त्यांची तत्वे हिंदू धर्मातील इतर जातीच्या नागरिकांचा सन्मान व आदर करणारी आहेत काय? ८) भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदू समाजातील शोषीत,पिडीत,वंचित,अधिकारविहिन नागरिकांसाठी काय करतो? ९) देशातील नागरिकांच्या प्रगती आड येणाऱ्या भांडवलदारांच्या अयोग्य निती विरोधात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरतो काय? १०) खाजगीकरणाच्या कायद्याने देशातील नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून वंचित केले आहे,या खाजगीकरण कायद्याच्या विरोधात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघर्ष का म्हणून करीत नाही?११) भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,जातीभेद व धर्मभेद नितीला महत्व देताना दिसत आहे.यामुळे ते या देशातील नागरिकांना समानता अन्वये शांतेत आणि बंधुता अंतर्गत योग्य प्रकारे जगू का म्हणून देत नाही? १२) लोकसभा व राज्यसभा मध्ये उच्च वर्णीय खासदाराऐवजी बहुजन समाजातील खासदार ते बहुसंख्येने का म्हणून निवडून पाठवीत नाही? १३) बहुजन समाजातील खासदारांना महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्री ते का म्हणून बनवीत नाही? १४) महाराष्ट्र राज्यात मराठा आणि इतर बहुजन समाजातील आमदार जास्त असताना देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री का म्हणून केले? महाराष्ट्र राज्यातील इतर पक्ष आमदारांना बुध्दी नाही काय? महाराष्ट्र राज्यातील इतर भाजपा पक्ष आमदार तत्वज्ञानी व हुशार नाही काय?
हे भाजपाच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिर्ष प्रमुखांनी सार्वजनिकरित्या भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सांगितले पाहिजे.
इतर धर्म व इतर जातींचा वर्ग…
पण,भारत देशातील आदिवासी (आदिवासी हे त्यांच्या संस्कृती नुसार हिंदू नाहीत असे त्यांचे राष्ट्रीय नेते म्हणतात.),बौद्ध,शिख,इसाई,जैन,मुस्लिम आणि अनुसूचित जाती व विमुक्त भटक्या जाती जमाती यांची संख्या पुढे आणल्या गेली तर जबरदस्तीने हिंदू म्हणवून घेणाऱ्यांची संख्या भारत देशात घटणार असल्याचे संकेत आहेत…
१) अनुसूचित जातीची लोकसंख्या १५ ते १७ टक्के आहे,ज्यांना हिंदू संस्कृतीत कवळीची किंमत नाही.अजनुही जातीभेदाच्या व धर्मभेदाच्या आड भारत देशात त्यांचे खून केली जातात व दिनदहाडे त्यांच्यावर अत्याचार केले जातात.यांनी स्वतःला हिंदू का म्हणून म्हणावे?हा एक गंभीर मुद्दा आहे..
२) आदिवासी समाज भारत देशात साडेसात टक्के (७/५) आहे.हा समाज स्वतःच्या संस्कृती नुसार त्यांचे सण व उत्सव पार पाडतोय.मग हा समाज सुध्दा हिंदू संस्कृतीचा भाग नसल्याचे दिसून येत आहे.
३) मुस्लिम समाज भारत देशात १० /९ टक्के आहे.भारताची मुस्लिम लोकसंख्या ही जगातील तिसरी सर्वात मोठी संख्या आहे.या समाजाची संस्कृती सुध्दा वेगळी आहे.पण,ते कुणावर अन्याय व अत्याचार करताना दिसत नाही.
४) भारतात शीख धर्माची टक्केवारी १.७% आहे.नवीनतम जनगणनेनुसार,सुमारे २ कोटी शिखांची लओकसंख्या आहे.
५) २०११ च्या जनगणनेनुसार,भारत देशाच्या लोकसंख्ये पैकी सुमारे जैन धर्माचे लोक लाखोंच्या संख्येने असण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये,भारताच्या एकूण अब्ज लोकसंख्येमध्ये जैन धर्माच्या लाख लोकांची नोंद झाली आहे.हा भारतातला सहावा सर्वात मोठा धर्म आहे.
भारतातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक जैन धर्म आहे.हा भारतात उगम पावलेला एक प्राचीन धर्म आहे.महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात,मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये जैन धर्मीयांची संख्या जास्त आहे.
६) भारतात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या बरीच आहे,ज्यामुळे हा भारतातील तिसरा सर्वात मोठा धर्म ठरतो.
७) २०११ च्या जनगणनेनुसार,भारतात बौद्ध धर्माचे प्रमाण ०.७% आहे.ज्यामध्ये सुमारे ८५ लाख लोक बौद्ध धर्मीय आहेत.काही अंदाजानुसार ही संख्या ५% ते ६% (६ ते ७ कोटी) किंवा १० कोटींपर्यंत असू शकते.
महाराष्ट्रात सर्वाधिक बौद्ध अनुयायी आढळतात,जे भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ७७.३६% आहेत.
प्रसिद्ध भारतीय बौद्ध भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते,भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत.महाराष्ट्रात बौद्ध धर्माचे प्रमाण ५.८१% आहे.
८) याव्यतिरिक्त, झोरोस्ट्रियन,यहुदी आणि बहाई धर्मांचे देखील हजारो अनुयायी भारतात आहेत..
तात्पर्य असे की भारतातील इतर धर्मांची लोकसंख्या व हिंदू संस्कृतीला न मानणाऱ्या जात वर्गाची लोकसंख्या सुध्दा ५० ते ६० कोटीच्या घरात आहे…
याचबरोबर ओबीसी समाजातील वैचारिक तत्वज्ञानी व अभ्यासक हे मनुवादी वर्णव्यवस्थे अंतर्गत जखडलेल्या हिंदू विचारसरणीला अजिबात मानत नसल्याचे व ब्राह्मण संस्कृती नुसार थोपवलेले क्रियाकर्म,सण,धर्म उत्सव सुध्दा मानत नसल्याचे दिसून आले आहे.
धर्म,जात रुढी परंपरेचा आलेख….
प्रश्न हा आहे की,जे हिंदू धर्माला अनुसरून हिंदू संस्कृती रात्रंदिवस सांगतात तेच उच्चवर्णीय,हिंदू धर्माला व हिंदू संस्कृतीला,हिंदू रितीरिवाजाला मानतात काय? त्यांच्या ट्रान्स्फर सर्टिफिकेट वर हिंदू धर्माची नोंद आहे काय?ते मग बहुजन समाजातील हिंदू रितिरिवाजाप्रमाणे होणाऱ्या उत्सवात तन-मन-धनाने सहकार्य करतात काय? व सहभागी होतात काय? ब्राह्मण बहुजन समाजातील नागरिकांच्या घरी जेवायला जातात काय? बहुजन समाजातील नागरिकांना व महिलांना आपल्या घरी जेवायला बोलावतात काय?, त्यांच्या मुलामुलींसी लग्न करतात काय?,ते भेदभाव करीत नाही काय?ते धर्मभेद व जातीभेद करीत नाही काय?ते स्वतःच्या सर्व कार्यक्रमात बहुजन समाजातील म्हणजे हिंदू संस्कृतीला मानणाऱ्या सर्व जाती अंतर्गत नागरिकांना मानसन्माने बोलावतात काय?
त्यांचे धार्मिक सण वेगळे व बहुजन समाजाचे धार्मिक सण वेगवेगळे आहेत काय? उच्चवर्णीयांनी स्वतःचे सण व बहुजन समाजाला गुलाम बनविणारी सांस्कृतिक परंपरा भारतातील बहुजन समाजावर जबरदस्तीने थोपवली काय? बहुजन समाजातील सण,उत्सव,सांस्कृतिक परंपरा नष्ट केल्यात काय?(कारण डिएनए नुसार ब्राह्मण हे भारताचे रहिवासी नाहीत.)
भारत देशातील उच्चवर्णीय लोक हिंदू संस्कृतीला अनुसरून सर्व प्रकारचा भेदभाव न जोपासणारी व न पाळणारी कृती स्वतः करीत असतील,तरच ते हिंदू संस्कृतीला व हिंदू धर्माला मानणाऱ्या भारत देशातील लोकांसाठी कार्य करतात असे मानले पाहिजे.
अन्यथा ते हिंदू या शब्दाला अनुसरून भडकावू भाषणे देऊन भारतीय नागरिकांचे,देशातील उच्चवर्णीय लोक शोषण करतात,त्यांना त्यांच्या सर्व अधिकारापासून दूर ठेवतात,त्यांच्यावर हमेशा अन्याय व अत्याचार करतात असे मानले पाहिजे..
उच्चवर्णीयांचा पगडा आणि त्यांच्या कार्यपध्दती…..
कारण भाजपा व आर.एस.एस.मध्ये उच्चवर्णीयांचा पगडा असून ते अनुसूचित जाती,जमाती,ओबीसी,अल्पसंख्या समाजातील नागरिकांना आपल्या संघटनेमध्ये महत्वाचे स्थान कधीच देत नाही.आणि एखाद्या वेळी दिले तरीही देशातील बहुसंख्य-बहुजन समाजाच्या हक्कांसाठी काही करू देत नाही हे वास्तव आहे.
तद्वतच आर.एस.एस.या संघटनेचे पदाधिकारी व सदस्य,”भारतीय संविधानाला,राष्ट्रीय ध्वजाला मानत नसतील तर त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य राष्ट्रद्रोही आहेत असे म्हटले पाहिजे.
बहुजन समाजातील नागरिकांचे विरोधक मानले पाहिजे…..
कारण त्यांच्यासह भारत देशात तमाम बहुजन समाजातील नागरिकांना/महिलांना भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच हक्क व अधिकार मिळाले आहेत.त्याच भारतीय संविधानाला व भारतीय ध्वजला भाजपा आणि आर.एस.एस.संघटनेतील प्रमुख,पदाधिकारी,सदस्य मानत नसतील तर भारत देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांचे ते विरोधक आहेत असेही माणले पाहिजे..
म्हणूनच देशहितासाठी व देशातील नागरिकांच्या हक्कांसाठी,संरक्षणासाठी, त्यांच्या जातीयवादी आणि धर्मवादी मनुविचारांचे बुरखे वेळेतच टराटर फाडले पाहिजे…


