शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
वोट चोरीच्या विरोधात आणि नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या संबंधाने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने चिमूर तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन आज करण्यात आले.
या आंदोलनातंर्गत तहसीलदार चिमूर यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या वतीने संबंधित मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले…
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी धरणे आंदोलनाला अनुसरून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.याचबरोबर मत चोरींचा जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे चिमूर तहसील कार्यालयापुढे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला विविध मागण्यातंर्गत करण्यात आलेले धरणे आंदोलन लक्षणिय ठरले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,सेवादलाचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रा.राम राऊत,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,पिरिपाचे जेष्ठ पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर अंबादे,चिमूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विनोद ढाकूणकर,तालुका सरचिटणीस विजय डाबरे, अनुसूचित जाती मोर्चाचे चिमूर तालुका अध्यक्ष तथा सावरी (बिडकर) चे सरपंच लोकनाथ रामटेके,शहर अध्यक्ष अगडे,यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.



