Home Maharashtra खल्लार पोलिस स्टेशन मधिल 16 बेवारस वाहनांचा लिलाव…

खल्लार पोलिस स्टेशन मधिल 16 बेवारस वाहनांचा लिलाव…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक 

        पोलिस स्टेशन खल्लार येथे 15 दुचाकी व 1ऑटो असे 16 वाहने बऱ्याच वर्षापासून बेवारस व क्षतीग्रस्त अवस्थेत पडून आहेत आजपर्यंत या वाहनांवर कुणीही मालकी हक्क सांगितला नाही. 

       बेवारस असलेल्या या 16 वाहनांचा लिलाव उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, दर्यापूर यांच्या आदेशानुसार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. 16 वाहनांचे आर टी ओ यांनी भंगार म्हणून किंमत आकारली असून सर्व वाहने ही खल्लार पोलिस स्टेशनमध्ये परीक्षणासाठी उपलब्ध आहेत. लिलाव संबंधी अटी व शर्ती व वाहनांची सविस्तर यादी नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.

        सदर लिलावात सहभाग घेणाऱ्याकडे व्यावसायिक कायदेशिर परवाना असणे आवश्यक आहे.शर्तीचे अधीन राहून ज्यांना लिलावात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी अमानत रक्कम 50 हजार रुपये भरणे आवश्यक आहे. अशी माहिती खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.