प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे खासदार मेंढे यांना निवेदन.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

        साकोली -प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने खासदार सुनील मेंढे साहेब यांना निवेदन देण्यात आले. 

त्यामध्ये जिल्ह्यात अजून पर्यत कलावंत मानधन निवड समिती तयार नसल्याने बऱ्याच कलावंतांचे 50 वर्षे पूर्ण झाले अशा कलावंतांना शासनामार्फत महिन्याला पेन्शन दिली जाते. कलावंतांचे कागदपत्रे तयार केलेली फाईल पंचायत समितीला दिलेली आहे.

परंतु जिल्ह्यात कलावन्त मानधन समितीची निवड नसल्याने बरेच कलावन्त वय झाली असल्यानंतरही पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, म्हणून कलावन्त मानधन समिती तयार करण्यात यावी या करिता निवेदन देण्यात आले.

    कोविड 19 मध्ये शासनाने कलावंतांना कोरोना पॅकेज 5000 हजार जाहीर केले इतर जिह्यामध्ये वाटप सुद्धा झाली परंतु आपल्या जिल्ह्यात अजून पर्यत कोरोना कलावन्त पॅकेज मिळालेला नाही तो पॅकेज लवकरात लवकर देण्यात यावा हे सुद्धा निवेदनात नमूद केले आहे. 

   निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले , साकोली संघटनेचे संचालक तिर्थानंद बोरकर, कोषाध्यक्ष मनोहर गंथाळे, केंद्रीय कोषाध्यक्ष मनोजभाऊ कोटांगले उपस्थित होते.