रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून ग्राम पातळीवर रोड नाल्या चे व घरकुलाचे कामे होताना दिसत आहे.
मात्र महाराष्ट्र निर्मिती कालखंडानंतर ग्राम पंचायत निर्मितीचा उदय झाला आणि आज आपण 2025 मध्ये जिवन जगत अहोत.
1960 ते1962 चे कालखंडात शासनाने प्रत्येक ग्राम पंचायत लां काही राखीव जागा अंतर्गत 7/12 वर आखीव नोंद आहेत.
त्यात 1) गावठाण जागा,2) चराई जागा,3) ढोर फोडी जागा, 4) अबादी ,5) स्मशान भूमी जागा याप्रकारे नोंदी आहेत.
यातील मेलेल्या माणसाला विधी करण्याच्या जागेवर अतिक्रमण बरेच ग्राम पंचायत ला दिसून येत आहे.यामुळे शासनाने व प्रशासनाने सदर नोंद असलेल्या जागा खाली करण्यासाठी उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी म्हटले आहे.



