कॅन्सर ग्रस्त मैत्रिणीला दिला दहावीच्या मित्रांनी मदतीचा हात… — वॉट्स ॲप ग्रुपने एकत्र आलेल्या दहावीच्या मित्र-मैत्रिणींनी जपले मैत्रीचे बंध…

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

              वॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र झालेल्या दहाव्या वर्गातील मित्र मैत्रिणींनी सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मैत्रिणीला तिच्या घरी भेट देवून काल (दि.२४) ला आर्थिक सहायता केली. “सिल्वर ज्यूबिली ऑफ टेंथ” नावाच्या वॉट्स ॲप ग्रुप मधील मित्रांना आपली एक वर्ग मैत्रीण कर्करोगाशी लढत आहे, हे कळताच वॉट्स ॲप ग्रुप मधील सर्व मित्रांनी दोन दिवसात काही रक्कम गोळा करून तिला आर्थिक सहायता दिली. शालिनी जीवने हे त्या कर्करोगाशी लढत असलेल्या वर्ग मैत्रिणीचे नाव आहे. ती मागील दोन वर्षांपासून आधी स्तनाच्या व नंतर डोक्याच्या कर्करोगाशी लढत आहे. वर्धा येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ती तिच्या स्थानिक सुमठाना येथील निवासी येवून असल्याचे ग्रुप मधील मित्र मैत्रिणींना कळले. तेव्हा लगेच तत्परता दाखवून काही मित्र मैत्रिणींनी तिची भेट घेतली व तिची आपुलकीने विचारपूस केली. त्यावेळी शालिनीच्या घरचे वातावरण अगदी भावुक होवून गेले होते.

            १९९६ ला स्थानिक जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात शिकलेल्या काही निवडक मित्र मैत्रिणींनी दहावीला पंचेविस वर्षे पूर्ण होत आहे म्हणून एक “सिल्वर ज्युबिली ऑफ टेंथ” नावाचा वाट्स ऍप ग्रुप बनविला. बघता बघता शंभराहून अधिक मित्र मैत्रीण त्या ग्रुप मध्ये सहभागी झालेत. त्यानंतर त्यांनी त्याच जिल्हा परिषद शाळेत त्यांना शिकविलेल्या सर्व शिक्षकांना बोलाविले. शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक गावंडे सर उपस्थित झाले होते. अत्यंत भावनिक वातावरणात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेला मदत करण्यात आली. आणि बिसी, पिकनिक, वाढदिवस साजरे करणे, कौटुंबिक स्नेहमिलन, गरीब वर्ग मित्र मैत्रिणीला मदत करणे, आदी उपक्रम सुरू झाले. याच उपक्रमाअंतर्गत कर्करोगग्रस्त मैत्रिणीला सिल्व्हर ज्युबीली ऑफ टेंथ ग्रुप तर्फे भेट देवून आर्थिक मदत करण्यात आली.

         यावेळी प्रा. रविकांत वरारकर, डॉ. मनोज हक्के, संदीप पाचभाई, जगदीश पढाल, महेश कांबळे, प्रो. अभय टोंगे, जितेंद्र साखरकर, गणेश नागपुरे, विजय इंगोले, सुरेंद्र हनुमंते, तारा खडसे, सुनिता वडस्कर, कीर्ती नगराळे, राखी सहारे, प्रवीण चौधरी, नम्रता धानोरकर, रुचिका बोढे, निमा ठाकरे, तारा खडसे, कीर्ती नगराळे, सुधीर चौधरी, रंजना उमरे, महेंद्र हक्के, सारिका डांगे, सुहास गोगुलवार, मुन्ना बांबोडे, रुपेश येरगुडे, राजू उके, आशीष मडावी, कीर्ती मिश्रा, प्रतिभा डांगे, लीना बैस, आदी उपस्थित होते.