Home Maharashtra शेतकरीच बांध पेटवून देत असल्याने शासनाचे वृक्षसंवर्धन धोक्यात… — खल्लार –...

शेतकरीच बांध पेटवून देत असल्याने शासनाचे वृक्षसंवर्धन धोक्यात… — खल्लार – दर्यापूर मार्गावरील अनेक वृक्ष जळून खाक… 

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

          निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासन एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी योजना राबविते मात्र शासनाच्या याच योजनेला शेतकरी वर्गापासून तिलांजली बसत असल्याचा प्रकार खल्लार दर्यापूर मार्गावर घडत आहे.

          सध्या शेतीच्या आंतरमशागतीचे कामे सुरु असून शेतकरी वर्ग कामे करीत असतांना त्यांच्या शेतातील बांधावरील कचरा जळण्यासाठी बांध पेटवून देतात. मात्र बांधाबरोबरच शासनाने लाखो रुपये खर्च करुन लावलेले वृक्ष हे संरक्षण जाळीसह जळून खाक होत आहेत.

          परिणामी नैसर्गिक पर्यावरणाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाबरोबर इतरांनाही याचा त्रास होत आहे.

प्रतिक्रिया 

         खल्लार दर्यापूर या रस्त्याने नेहमीच कपाशीने भरलेली गाडी घेऊन जात असतो. या मार्गावरील शेतकरी त्यांच्या शेतावरील बांध पेटवून देतात यात रस्त्यावर लावलेले झाडे तर जळून खाक होतातच. जर आगीची एखादी ठिणगी कपाशीच्या गाडीवर पडली तर वित्तहानी व जिवीतहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार राहील. 

सोपान घुरडे 

 वाहन चालक